Pomegranate Rate : स्पेनच्या ‘पोमवंडर’शी भारताच्या ‘भगव्या’ची स्पर्धा

भारतीय डाळिंबाला जगभरातील ग्राहक डाळिंबाच्या चवीसाठी पहिली पसंती देतात, त्यामुळे ग्राहकराजा खूष होत असला, तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने वजन आणि आकारामध्ये मात्र ते आजही मागे आहे.
Pomegranate Rate
Pomegranate RateAgrowon

सोलापूर ः भारतीय डाळिंबाला (Indian Pomegranate) जगभरातील ग्राहक डाळिंबाच्या चवीसाठी (India's Pomegranate Test) पहिली पसंती देतात, त्यामुळे ग्राहकराजा खूष होत असला, तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने वजन आणि आकारामध्ये मात्र ते आजही मागे आहे. स्पेनच्या ‘पोमवंडर’ या डाळिंबाशी (Pomewonder Pomegranate Verity) भारताचा ‘भगवा’ वाण (Bhagwa Verity) चांगली स्पर्धा करतो आहे, पण वजन आणि आकारात तो कमी पडतो आहे.

भारत हा जगातील सर्वाधिक फलोत्पादन घेणारा देश आहे. फळे आणि भाजीपाला उत्पादनात भारताचा वाटा दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पण निर्यातीतील वाटा अगदीच कमी आहे. यामध्ये डाळिंबाची निर्यात अवघ्या दोन टक्क्यांपर्यंत होते. देशात डाळिंबाचे क्षेत्र तब्बल पावणेदोन लाख हेक्टरवर आहे. पण कीड- रोगाच्या समस्येमुळे उत्पादनात घट होते आहे. अलीकडच्या काही वर्षांत क्षेत्रवाढ आणि उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला आहे.

Pomegranate Rate
Pomegranate : सोलापुरातील डाळिंब संशोधन केंद्रावर शेतकऱ्यांची नाराजी

सध्या डाळिंबाचे क्षेत्र १ लाख ४० हजार हेक्टरवर खाली आले आहे. अर्थात, उत्पादन या केवळ एका कारणापेक्षाही फळांची गुणवत्ता, दर्जा, वजन आणि आकार या बाबतची काही कारणे त्यामागे आहेत. हीच कारणे आता डाळिंबाच्या निर्यातीतील प्रमुख अडथळा ठरत आहेत.

Pomegranate Rate
Pomegranate Rate : डाळिंबाची खुलली लाली, दराला झळाळी

...म्हणून पोमवंडरला उठाव

स्पेन, इराण, इराक, इस्राईल या देशांतील डाळिंबाशी भारतीय डाळिंबाची स्पर्धा होते. विशेषतः स्पेनच्या पोमवंडर वाणाची तुलना भारतीय भगव्या डाळिंबाशी होते. चवीसाठी भगवा वाण तसे उत्कृष्ट आहे. चवीमध्ये पोमवंडर आंबटगोड आहे. तर ‘भगवा’ अगदीच गोड आहे.

पण अन्य बाबतींत त्यांची तुलना करता भगवा वाणाचे वजन सर्वाधिक ४०० ते ५०० ग्रॅमपर्यंत भरते, पण पोमवंडर तब्बल ६०० ते ७०० ग्रॅमपर्यंत भरते. पोमवंडरचा आकार मोठा आहे. त्या तुलनेत भगव्याचा आकार मर्यादित आहे. भगव्या वाणातून सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत ज्यूस मिळतो. पण हेच प्रमाण पोमवंडरमध्ये ५ टक्क्यांनी अधिक आहे. साहजिकच अनेक वेळा बाजारात पोमवंडरला चांगला उठाव मिळतो.

निर्यातीतील वाटा वाढवायचा असेल, तर जगातील डाळिंब वाणांचा विचार करून आपल्याला काम करावे लागेल. आपल्याकडे यापूर्वी पोमवंडर लागवडीचा प्रयोग झाला. पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे नवीन वाणाचा शोधच यावर कामी येणार आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com