Marigold Market : जळगावात झेंडूची आवक कायम

बाजारात झेंडू फुलांची आवक गेल्या तीन दिवसांत वाढली आहे. दरही टिकून आहेत. किमान २५ व कमाल ३५ रुपये प्रतिकिलोचा दर या फुलांना घाऊक बाजारात शेतकऱ्यांना मिळाला.
Marigold Market
Marigold MarketAgrowon

जळगाव ः  बाजारात झेंडू (Marigold Market) फुलांची आवक गेल्या तीन दिवसांत वाढली आहे. दरही टिकून आहेत. किमान २५ व कमाल ३५ रुपये प्रतिकिलोचा दर या फुलांना घाऊक बाजारात शेतकऱ्यांना मिळाला.

Marigold Market
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

वल्लभदास वालजी (गोलाणी) व्यापारी संकुलातील बाजारात पहाटेच आवक होते. सध्या रोज सुमारे ५७ क्विंटल झेंडू फुलांची आवक होत आहे. गेले दोन दिवस एवढीच आवक या बाजारात झाली. दरही कमाल ३५ रुपये प्रतिकिलो, असा शेतकऱ्यांना मिळाला. दिवाळी सणानिमित्त या फुलांना मागणी आहे. यामुळे दरही टिकून आहेत.

काही शेतकऱ्यांनी जळगाव शहरात विविध भागांत या फुलांची ग्राहकांना थेट विक्री सुरू केली. त्यात किमान ४० व कमाल ६० रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना मिळाला. फुलांची आवक टिकून असल्याने तुटवडा कुठलाही जाणवत नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी कोविडमुळे पणन व्यवस्था आक्रसली होती. यामुळे अनेकांनी जून, जुलैमध्ये झेंडूची लागवड टाळली. परिणामी, पुढे दिवाळीला फुलांचा तुटवडा जाणवला व प्रतिकिलो २०० ते २५० रुपये प्रतिकिलोचा दर या फुलांना मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com