Cotton Rate : भाव घसरणीमुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत

या वर्षी कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे प्रतिक्विंटल १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापसासाठी लागणारा खर्च व सध्या मिळणारा ८ हजारांचा भाव या बाबी पाहता शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नसल्याची चर्चा आहे.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

बाणगाव बुद्रूक, ता. नांदगाव : कापूस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नगदी पीक. यावर्षी कापसाला मुहूर्तावर निघालेला १० ते १२ हजारांचा भाव (Cotton Rate) तसेच मागीलवर्षी मिळालेल्या १२ ते १३ हजारांच्या भावामुळे कापूस उत्पादकांना (Cotton Producers) चांगल्या भावाची अपेक्षा लागली होती.

असे असतानाच डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे कापसाच्या दरात सुमारे तीन ते साडेतीन हजारांची घट झाल्याने उत्पादन (Cotton Production) शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरात घट झाल्याने उत्पादकांनी पांढरे सोने घरात साठवून ठेवले आहे.

या वर्षी कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे प्रतिक्विंटल १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापसासाठी लागणारा खर्च व सध्या मिळणारा ८ हजारांचा भाव या बाबी पाहता शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नसल्याची चर्चा आहे.

कापसाला किमान १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळावा, अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत; मात्र सध्या बाजारात ८५०० पर्यंत भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांत पुन्हा दहा हजारांपुढे भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवला आहे.

नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी जादा भावाचे गाजर दाखविले; मात्र चांगला भाव अद्याप मिळाला नाही. कधी ७५०० ते ८५०० तर कधी ९५०० असाच सध्याचा भाव मिळत आहे.

Cotton Rate
Cotton Market : कापूस बाजाराला सरकी दराचा मजबूत आधार

गरजेपुरतीच कापसाची केली जाते विक्री

सुरवातीला आलेला ओला कापूस शेतकऱ्यांनी वजन वाढत असल्याने विकला. त्या वेळी भावदेखील दहा हजारांच्या जवळपास होते. तर काहींनी मुहूर्तावर जमलेला कापूस देत चांगला भाव घेतला.

यानंतर कापूस ८२०० वर येऊन ठेपला. पुन्हा त्यात वाढ होत भाव ८५०० पर्यंत पोहोचला; मात्र दहा ते बारा हजारांच्या भावाची अपेक्षा असल्याने कापूस घरात भरला आहे. त्यामुळे जेवढी गरज, तेवढाच कापूस विकण्यात येत आहे.

हमखास उत्पन्न देणारे एकमेव पीक म्हणून आम्ही कपाशीची लागवड करतो. पण दिवसेंदिवस कापूस लागवडीपासून ते काढणीपर्यंत बियाणे, औषधे, मजुरी हा खर्च वाढतच आहे. त्यात पर्जन्यमान कमी जास्त असते, बेमोसमी पाऊस यामुळे कापसाचे उत्पादन घटते. कापसाला १० हजारांच्या वर भाव गेला तर तरच चांगले पैसे मिळतील.
देविदास घोडके, कापूस उत्पादक शेतकरी
या वर्षी सुरुवातीला कापसाला दहा हजारांचा भाव मिळाला. पण हा भाव टिकला नाही. काही दिवसांत भाव कोसळले. कापूस विक्रीसाठी आला तर भाव कमी होतात. विक्री थांबली तर भाव वाढतात. साधारण एप्रिलमध्ये कापसाला चांगला भाव मिळू शकतो. पण तोपर्यत थोड्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी असेल.
अतुल कवडे, कापूस खरेदीदार व्यापारी, बाणगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com