Cotton Rate : कापूस यंदाही भाव खाणार?

देशातील वायद्यांमध्ये कापसाच्या दरात मोठी वाढ झाली. ऑगस्ट आणि डिसेंबरच्या वायद्यांमध्ये खंडीमागे तब्बल ३१ हजार रुपयांचा फरक आहे.
cotton rate
cotton rate agrowon

पुणेः देशातील वायद्यांमध्ये कापसाच्या दरात (Cotton Rate) मोठी वाढ झाली. ऑगस्ट आणि डिसेंबरच्या वायद्यांमध्ये खंडीमागे (Candy Of Cotton) तब्बल ३१ हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळं एमसीएक्सवर कापसामध्ये सट्टेबाजी होत असल्याचा आरोप कापड उद्योग (Textile Industry) करतोय. पण देशात कापसाचा मोठा तुटवडा (Cotton Shortage) असल्यानं वाढले, असे जिनिंग आणि सुतगिरण्यांचं म्हणणं आहे. मात्र देशातील वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market Cotton Rate) वाढता दर पाहून देशात यंदाही शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

देशात सध्या खरिपाच्या पेरण्या सुरु आहेत. लागवडीच्या ताज्या आकडेवारीनुसार कापसाखालील क्षेत्र सध्या वाढलेलं आहे. मात्र मागील हंगामात कापूस उत्पादन जवळपास २० टक्क्यांनी कमी राहीलं. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते देशात २०२१-२२ च्या हंगामात ३१५ लाख गाठी कापसाचं उत्पादन झालं. मात्र देशात कापसाचा वापर ३० टक्क्यांनी वाढला. त्यामुळं देशात कापसाच्या दरात तेजी आली होती. कापूस दर ऐन आवकेच्या काळातही तेजीत होते. सध्या देशातील बाजार समित्यांमधील सरासरी कापूस दर १० हजरा ६२१ रुपये प्रतिक्विंटलवर आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाचा दर कमी असला तरी वायद्यांमध्ये मात्र मोठी उलथापालथ सुरु आहे.

cotton rate
Cotton: कापसावरील किडी, तणांचा बंदोबस्त कसा कराल?

देशातील मल्टी कमोडिटीज् एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर गुरुवारी कापसाचे ऑगस्ट महिन्याचे वायदे प्रतिगाठी ४८ हजार ९०० रुपयाने झाले. एक कापूस गाठ १७० किलोची असते. तर खंडीमध्ये हा दर १ लाख २ हजार रुपये होतो. एक खंडी ३५६ किलो कापसाची असते. ऑक्टोबर महिन्यातील वायदे ३९ हजार ८९० रुपये प्रतिगाठी म्हणजेट ८३ हजार ५३४ रुपये प्रतिखंडीने झाले. तर नोव्हेंबरचे वायदेही ३४ हजार ९४० रुपये प्रतिगाठी अर्थात ७३ हजार रुपये प्रतिखंडीने झाले. मात्र डिसेंबरचे वायदे ३३ हजार ८८० रुपये प्रतिगाठीने पार पडले. खंडीमध्ये हा दर जवळपास ७१ हजार रुपये होतो.

cotton rate
Cotton Production:दर्जेदार कापूस उत्पादनात हेच ध्येय

म्हणजेच ऑगस्ट आणि नोव्हेंबरच्या वायद्यांमध्ये २९ हजार रुपयांची तफावत आहे. तर ऑगस्ट आणि डिसेंबरच्या वायद्यांमध्ये ३१ हजार रुपयांचा फरक आहे. वायद्यांमधील हा फरक सर्वांनाच चकित करणारा आहे. त्यामुळं वायद्यांमधील दराविषयी चिंता व्यक्त होतेय. कापसाच्या वायद्यांमध्ये एव्हढी तफावत पहिल्यांदा पाहायला मिळत असल्याचं कापड उद्यागाचं म्हणणं आहे. बाजारात कापसाचे दर कमी जास्त झाले की जिनिंग रुईचा आणि सुगिरण्या सुताचा दर लगेच कमीजास्त करु शकतात, मात्र कापड उद्योगाला झालेल्या सौद्यात बदल करता येत नाही, असं इचलकरंजी येथील कापड उद्योजक विनय महाजन यांनी सांगितलं.

देशात कापसाचे वायदे वाढले असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कापसाचे दर कमी आहेत. न्यूयाॅर्क येथील इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज अर्थात आयसीईवर ऑगस्टचे वायदे १०६.९१ सेंट प्रतिपाऊंडने झाले. खंडीमध्ये हा दर ६७ हजार २४१ रुपये होतो. तर डिसेंबरचे वायदे १०१.८०० सेंटने झाले. म्हणजेच ६४ हजार खंडीने हा कापूस मिळेल. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी आहेत.

साधारणपणे देशातील वायद्यांचे दर न्यूयार्क वायद्यांपेक्षा कमी असतात. पण १० वर्षांत पहिल्यांदाच देशातील दर अधिक आहेत. सध्या देशातील कापसाचा भाव ६० टक्क्यांनी जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आयसीईवरील दरानुसार व्यवहार होतात. त्यामुळं देशातून सूत, कापूस आणि कापड निर्यात घटली. मात्र देशात कापसाचा पुरवठाच कमीये. देशातील उद्योगाने कापसाचा वापर ३० टक्क्यांपर्यंत कमी केला तरी गरज भागणार नाही, असं कापूस निर्यातदार अविनाश काबरा यांनी सांगितलं. तसचं कापसाचे दर केवळ देशातच वाढले नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

देशात आतापर्यंत कापसाची लागवड वाढलेली दिसतेय. मात्र पावसानं पिकाचं नुकसान होतंय. नुकसानीचे आकडे आणखी वाढल्यास उत्पादन कमी होण्याचा अंदाज येईल. त्यामुळं कापसाचे दर आणखी सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. अमेरिकेतील कापूस पिकाची स्थिती पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारत. त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. परिणामी देशातील कापूस दरालाही आधार मिळू शकतो. नवीन हंगामात शेतकऱ्यांना ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये दर मिळेल, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

मी व्यवसायात उतरलो तेव्हापासून कापसाच्या वायद्यात एवढा फरक पाहिला नाही. एमसीएक्सवर पूर्णपणे सट्टेबाजी सुरु आहे. या सट्टेबाजामुळे कापड उद्योगाला काम करणं अवघड झाले. रुईचे दर वाढले की लगेच सुताचेही दर वाढतात. मात्र आम्हीला कापडाचे केलेले सौदे मोडता येत नाही. सूत स्वस्त असताना केलाला सौदा सूताचे दर वाढले तरी तोटा सहन करून पूर्ण करावा लागतो.
विनय महाजन, कापड उद्योजक, इचलकरंजी
आयसीईवरील कापसाचे दरही ९० सेंटवरून १०६ सेंटपर्यंत वाढले. सध्या अमेरिकेतील पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळं कापसाचा दर १२० सेंटपर्यंत पोचेल असा आमचा अंदाज आहे. आयसीईवर कापूस १२० सेंटवर पोचल्यास प्रतिखंडी ७६ हजार रुपये दर होईल.
अविनाश काबरा, कापूस निर्यातदार
एमसीएक्सवर सध्या चालू महिन्याचे वायदे तेजीत आहेत. ऑगस्ट वायद्याचा भाव १ लाख २ हजार रुपये आहे. तर प्रत्यक्ष बाजारात ९५ हजार रुपये खंडीने कापूस विकला जात आहे. सध्या देशात कापसाचा मोठा तुडवडा असल्यानं दर वाढले. पुढील हंगामातील कापूस ऑक्टोबरपासून येईल. त्यामुळं त्या महिन्यातील वायदे कमी दराने झाले. यात सट्टेबाजी झाली असे म्हणता येणार नाही.
अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
जाणकारांच्या मते देशात सध्या नगण्य कापूस उपलब्ध आहे. त्यातच मिल्स आवश्यक तेव्हढाच कापूस खरेदी करत आहेत. भविष्यात कापूस आयात वाढू शकते हे लक्षात घेऊन वाढलेल्या दरात तात्पुरती गरज भागेल एवढाच कापूस खरेदी होतोय. परिणामी नवीन हंगाम सुरु होण्याआधी कापसाचे वायदे वाढले आहेत.
गोविंद वैराळे, जेष्ठ कापूस तज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com