Cotton Rate : कापूस बाजाराला उभारी मिळण्याची शक्यता

जागतिक पातळीवर कापूस दर दबावात आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात पुढील काळात कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज असल्यानं दरालाही आधार मिळण्याची शक्यता आहे.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

पुणेः जागतिक पातळीवर कापूस दर (Global Cotton Rate) दबावात आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात (Global Cotton Market) पुढील काळात कापसाला मागणी (Cotton Demand) वाढण्याचा अंदाज असल्यानं दरालाही आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री (Cotton Sale) केल्यास फायदेशीर ठरेल, असं जाणकार सांगत आहेत. मात्र कापसाला मागणी का कमी आहे? कापसाला मागणी कधी वाढेल? शेतकऱ्यांना त्या काळात काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

देशात यंदा अपेक्षेपेक्षा कमी कापूस उत्पादन राहूनही दर काहीसे दबावात दिसत आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम देशातील कापूस बाजारावरही होत आहे. जागतिक कापड बाजाराचा विचार करता मागणी अद्यापही पूर्वपातळीवर आलेली नाही. अनेक देश सध्या महागाईला तोंड देत आहेत. त्यामुळं सप्टेंबर महिन्यातही जागतिक कापड मागणी कमी राहीली. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला. आशियातील स्थिती काहीशी चिंताजनक होती. कापड बाजारातून मागणी कमीच असली तरी विचारणा मात्र वाढली. त्यामुळं पुढील काळात कापडाला मागणीही वाढू शकते, अशी आशा निर्माण झाली.

Cotton Rate
Cotton Crop Damage : हाती आलेला कापूस वाया जातोय

सप्टेंबर महिन्यात दक्षिण अमेरिका आणि युरोपियन युनियनमधून काही प्रकारच्या कपड्यांना मागणी वाढली होती. तर भारतात दिवाळीच्या सणामुळं कापड बाजाराला उभारी मिळाली. यंदा दिवाळी ऑक्टोबरमध्येच आली. त्यामुळं ऐन कापूस आवकेच्या हंगामात कापडालाही उठाव मिळतोय. ऑक्टोबर महिन्यातील कापडाची मागणी जास्तच असेल. त्याचा तपशील पुढील महिन्यात येईल. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही पुढील महिन्यापासून कापडाला उठाव मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास कापसालाही मागणी वाढेल. या काळात कापूस दरालाही आधार मिळेल, असं जाणकार सांगत आहेत.

Cotton Rate
Cotton Picking : कापसाची वेचणी कशी कराल ?

देशात दिवाळी आणि रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी कापूस विक्री केल्याचं दिसतं. दिवाळीच्या आधी १० ते १५ दिवस कापसाची आवक जास्त होती. दरवर्षी दिवाळीच्या काळात बाजारातील आवक जास्त असते. शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊन व्यापारी अनेकदा दर दबावात ठेवतात. यंदाही बाजारातील आवक वाढल्यानंतर दर दबावात येत गेले. सध्या देशात कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ते ९ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळतोय.

कापसाचे दर सध्या दबावात असले तरी जागतिक बाजारात कापडाला मागणी वाढल्यानंतर कापसाचेही दर सुधारु शकतात. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कापूस बाजाराला आधार मिळू शकतो. सध्याची परिस्थिती पाहता डिसेंबरमध्ये मागणी वाढली तर शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा गेऊन टप्प्याटप्याने कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com