Cotton Market : कापूस दर हमीभाव पातळीकडे

Cotton Rate : कापूस बाजारात दरांची घसरण कायम आहे. कमी दर्जाच्या (कवडी) कापसाचे दर सहा हजार रुपयांखाली आहेत.
Cotton Market
Cotton Market Agrowon

Cotton Bazar Bhav Jalgaon : कापूस बाजारात दरांची घसरण कायम आहे. कमी दर्जाच्या (कवडी) कापसाचे दर सहा हजार रुपयांखाली आहेत. तर दर्जेदार कापसाला खानदेशात खेडा खरेदीत कमाल ७०५० व ६८८० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

दरात घसरण कायम राहू शकते. कारण आवक वाढली आहे. पुढे दर हमीभावाची पातळी गाठतील म्हणजेच दर ६३०० रुपयांखाली जाऊ शकतो, अशीही शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सरकीचे दर सतत कमी होत असून, दर २७०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये सरकीचे दर ३८०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. सोयाबीन, सूर्यफुल तेलाचे दर कमी झाले आहेत. सरकीच्या तेलास उठाव कमी आहे.

तसेच पशुखाद्याची मागणीही हवी तेवढी नाही. कापसात सरकीचे उत्पादन कापसात अधिक येते. एक क्विंटल कापसात ६३ ते ६४ किलो सरकी येते. यामुळे सरकी दरातील घसरण कापूस दरांवर दबाव वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.

Cotton Market
Cotton Production : ...तर कापूस उत्पादकांचे नुकसान द्या भरून

सध्या खानदेशात प्रतिदिन ६० ते ६५ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. अर्थात रोज १० ते ११ हजार गाठींची निर्मिती होत आहे. कापसाची आवक मागील १० ते १२ दिवसांत वाढली आहे, ती कायम आहे.

कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे कमी आहे. परंतु निर्यात हवी तशी नाही. सुताचे दर २६० रुपये प्रतिकिलोवरून २४० रुपये प्रतिकिलो, असे झाले आहेत. परिणामी, दरांवर दबाव वाढला आहे. खानदेशातून गुजरातमधूनही कापसाला मागणी कमी झाली आहे. स्थानिक कारखान्यांत मागणी आहे.

Cotton Market
Cotton Market : रोज किती कापूस बाजारात येतोय?

दरातील घसरण कायम राहणार

कापूस दरातील घसरण कायम असणार आहे. कारण उत्तर भारतात कापसाची लागवड वाढली आहे. तसेच अमेरिका, ब्राझील या भागात कापसाची लागवड काहीशी कमी झालेली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीची स्थिती आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदी आणि इंधनातील तेजी यामुळे युरोप, अमेरिकेतील स्थिती बिकट बनली आहे.

परिणामी, कापड बाजारास अनुकूल स्थिती नाही. कापड उद्योगात अग्रेसर असलेल्या बांगलादेश, पाकिस्तानमध्ये वित्तीय आणीबाणी आहे. तेथे परकीय चलन किंवा डॉलरचे दर सतत वाढत आहेत. यामुळे कापूस उद्योग सतत अडचणीत येत असून, दरांमधील घसरण कायम राहील. पुढे शासनाला हमीभावात कापूस खरेदी करावी लागू शकते, असाही अंदाज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com