
Cotton Market Update : जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठा (Cotton Market) असलेल्या मानवत, सेलू, परभणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील कापसाच्या दरात (Cotton Rate) सुधारणा नाही. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून कापूस दर दबावातच आहेत.
किमान ६५०० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत, तर कमाल दर ८००० रुपयांच्या आसपास आहेत. दरामध्ये किंचित चढ-उतार सुरू आहेत. अपेक्षित सुधारणा होत नसल्याने घरी कापूस असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कापसाच्या बाजारपेठात किंचित सुधारणा झाली होती. किमान दर ८००० रुपयांवर गेले होते. त्यामुळे घरात कापूस असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु बाजार समित्यांची निवडणूक तसेच अवकाळी पावसामुळे काही दिवस खरेदी बंद राहिली.
दरात शेतकऱ्यांना अपेक्षित सुधारणा झाली नाही. मानवत व सेलू कृषी उत्पन्न बाजार समित्यांत गेल्या काही आठवड्यापासून किमान व कमाल दरात घसरण झाली आहे. खेडा पद्धतीच्या खरेदीचे कमाल दर प्रतिक्विंटल ७००० ते ७२०० रुपयांपर्यंत घसरले आहेत.
सोमवारी (ता.८) सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ६३०० ते कमाल ७९४० रुपये, तर सरासरी ७८६० रुपये दर मिळाले.
शुक्रवारी (ता.५) प्रतिक्विंटल किमान ६३०० ते कमाल ८०२३ रुपये, तर सरासरी ७९६५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.४) प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७९५० रुपये, तर सरासरी ७९०० रुपये दर मिळाले.
मानवत बाजार समितीत शनिवारी (ता.६) कापसाची ४६४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ६६०० ते कमाल ७९३० रुपये, तर सरासरी ७८०० रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता.३) कापसाची ३४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६६०० ते कमाल ८०१५ रुपये, तर सरासरी ७९३५ रुपये दर मिळाले. परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे पहिल्या दोन वेचणीचा चांगल्या दर्जाचा कापूस अद्याप गेल्या सहा महिन्यांपासून घरातच आहे. त्यांना किमान ९००० रुपये दराची अपेक्षा आहे. मागील महिनाभरापासून दर दबावातच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.