जळगाव ः अमेरिकन कृषी विभागाने (यूएसडीए) नवा कापूस उत्पादन (Cotton Production) व साठा, वापर यासंबंधीचा अहवाल नुकताच जारी केला आहे. यानंतर कापूस बाजार (Cotton Market) संथ व आणखी सावध झाला आहे. न्यू यॉर्क वायद्यामध्ये कापूसदर (Cotton Rate) ८२ सेंट प्रतिपाउंडवर आला आहे.
कापूसदरात पडझड झाली आहे. सरकीचे दर प्रतिक्विंटल ३६०० रुपये झाले आहेत. सरकीचे दर ३९०० होते. कापूस आवक स्थिर आहे.
देशात सध्या रोज एक लाख २० हजार गाठींची आवक होत आहे. राज्यात रोज २५ ते २७ हजार गाठींची आवक आहे. खंडीचे (३५६ किलो रुई) दर ६० हजार ५०० ते ते ६१ हजार रुपये असे आहेत. अर्थात, कापसाच्या खेडा खरेदीचे दरही कमी झाल्याचे चित्र आहे.
अमेरिकन कृषी विभागाने नुकताच नवा अहवाल कापसाबाबत जाहीर केला आहे. त्यात जगात कापसाचा अखेरचा साठा (एण्डिंग स्टॉक) ७० लाख गाठींनी अधिक राहील, असा अंदाज आहे. यामुळे बाजारात काहीशी पडझड झाली आहे. तसेच भारतात कापसाचे उत्पादन सुमारे ३४० लाख गाठी एवढे राहील, असेही म्हटले आहे.
जगात कापूससाठा वाढेल, यामुळे बाजार सावध झाला आहे. कारण वापर कमी होईल, असे यातून दिसत आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आदी देशांमधील कापूस निर्यातही मागील हंगामाच्या तुलनेत कमी झाल्याचे त्यात म्हटले आहे.
चीनमध्ये लवकरच नवीन वर्षाची धामधूम
चीनमधील अस्थिर स्थिती, युरोपातील मंदी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) नकारात्मक घडामोडी रशिया युक्रेन युद्ध आदी कारणांनी कापूस बाजारावर परिणाम झाल्याचे जाणकार सांगत आहेत.
चीनमध्ये लवकरच नवीन वर्षाची धामधूम सुरू होईल. तेथे २० ते २५ दिवस सर्व उद्योग बंद राहतो. यामुळेदेखील कापूस बाजार संथ झाल्याचे सांगितले जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.