Cotton Market Rate : परभणी जिल्ह्यात कापसाचे दर कोसळले

Cotton Bajarbhav : परभणी जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या आठवड्यापासून दरात घसरण सुरू आहे. कापसाच्या दरात क्विंटल मागे १०० ते ३५० रुपयांनी घसरण झाली आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Market Update : परभणी जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या आठवड्यापासून दरात घसरण सुरू आहे. कापसाच्या दरात क्विंटल मागे १०० ते ३५० रुपयांनी घसरण झाली आहे. ‌दर कोसळल्यामुळे अद्याप एकही बोंड कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी तूर्त निराशा पडली आहे.

गेल्या महिनाभरापासून परभणी जिल्ह्यातील कापूस दर दबावातच आहेत. किमान ६२०० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. तर कमाल ७५९० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. यंदाच्या हंगामातील सध्याचे कापूस दर हे नीचांकी आहेत.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांतील कापसाच्या दरात किंचित सुधारणा होऊन कमाल दर ८००० रुपयांवर गेले होते. त्यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते.

परंतु कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक त्यासोबत लागून राहिलेला अवकाळी पाऊस, ढसाळ वातावरण यामुळे अनेक ठिकाणची कापूस खरेदी काही दिवस बंद राहिली. तेव्हापासून दरात घसरण सुरू झाली. खेडा पद्धतीच्या खरेदीचे दर ७००० रुपयांपर्यंत घसरले आहेत.

Cotton Market
Cotton Market : खानदेशात कापसाचे दर नीचाकी स्थितीत

सोमवारी (ता. ८) सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ६३०० ते कमाल ७९४० रुपये तर सरासरी ७८६०रुपये दर मिळाले होते. परंतु सोमवारी (ता. १५) प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७५९० रुपये तर सरासरी ७५४० रुपये दर मिळाले.किमान दरात १०० रुपयांची तर कमाल दरात ३५० रुपये घट झाली.

Cotton Market
Cotton Market Rate : कापूस ७००० ते ७५०० रुपयांवर स्थिरावला

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. १३) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६६०० ते कमाल ७७३० रुपये तर सरासरी ७६०० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. १२) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६६०० ते कमाल ७७३५ रुपये तर सरासरी ७६२५ रुपये दर मिळाले.

परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचा कापूस गेल्या सहा महिन्यापासून घरातच आहे. दरात घसरण सुरुच त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

सरकीच्या दरात तेजी नाही. परिणामी कापसाचे दर कोसळत आहेत. दर आणखीन कमी होऊन नुकसान होईल या भीतीने शेतकरी कापूस विक्रीस काढत आहेत. त्यामुळे आवक वाढली आहे. सरकीला उठाव नसल्यामुळे अनेक व्यापारी देखील अडचणीत आहेत. कापूस खेरीदासाठी अनेकांकडे चलनाचा तुटवडा जाणवत आहे, आदी कारणांमुळे कापसाच्या दरात सुधारणा होत नाही.

- राजीव वाघ, सचिव, सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com