Cotton Rate : कापूस दर नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील पाच दिवसांमध्ये कापसाचे दर जवळपास १० टक्क्यांनी कमी झाले. चालू हंगामात जागतिक कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.
 Cotton Rate
Cotton RateAgrowon

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे दर (Cotton Rate Global Market) जवळपास साडेतीन टक्क्याने नरमले होते. तर देशातील वायदे बाजारातही कापसाचे दर (Cotton Rate) कमी झाले होते. त्यामुळं बाजारात समित्यांमध्येही कापूसाचे दर क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी तुटले होते.

 Cotton Rate
Cotton Production : चंद्रपूर आता कापूस उत्पादक तालुका

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील पाच दिवसांमध्ये कापसाचे दर जवळपास १० टक्क्यांनी कमी झाले. चालू हंगामात जागतिक कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच चीनची अर्थव्यवस्था कोरोनाच्या जोखडातून मुक्त होण्याची आशा निर्माण झाली.

चालू हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिर राहिले. पाच दिवसांपुर्वीचे म्हणजेच १६ नोव्हेंबरला सीबाॅटवर कापसाचे व्यवहार ९०.२५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. त्यात सतत नरमाई येत गेली. आज कापसाचे वायदे ८१.२७ सेंट प्रतिपाऊंडवर आले.

 Cotton Rate
Cotton Rate: कापसाचे नऊ हजारांवर दर;पण एकरी उत्पादनात घट

देशातील कापसाचे वायदेही आज अडीच टक्क्यांनी तुटले होते. मल्टी कमोडीटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर कापसाच्या वायद्यांमध्ये आज गाठीमागे ७८० रुपयांची घसरण झाली. एक गाठ १७० किलो रुईची असते. आज ३१ हजार ३८० रुपये प्रतिगाठीने डिसेंबरचे वायदे पार पडले. तर नोव्हेंबरचे वायदे ६७० रुपयांनी घसरून ३२ हजार २४० रुपयांवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय वायदे बाजारत घसरण झाल्याचा परिणाम देशातील कापूस दरांवर झाल्याचं शेतीमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी सांगितलं. ते नेमकं काय म्हणतात ते पाहू…

काय आहे दरपातळी?

तिकडे वायद्यांमध्ये कापूस दर नरमल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कापूसचे दर काहीसे कमी झाले होते. मात्र कापसातील तेजी अद्यापही टिकून आहे. देशातील अनेक बाजारात आज कापसाच्या दरात क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची नरमाई दिसून आली होती. कापसाचा दरासरी दर हा ८ हजार ६०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहे. तर अनेक बाजारांमध्ये कमाल दर ९ हजार ६०० रुपये मिळाला.

दर काय राहू शकतो?

सध्या कापसाचे दर काहीसे नरमले. मात्र देशात यंदा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच मागील हंगामातील खुपच कमी कापूस शिल्लक आहे. त्यामुळं कापसाचे दर जास्त नरमण्याची शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांना यंदा सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डाॅलर मजबुत झाल्याने कापसाच्या दरात नरमाई दिसली. डाॅलर इंडेक्स मजबुत होत आहे. याचा परिणाम अमेरिकेच्या कापूस दरावर होतोय. डाॅलरचा दर वाढल्यास अमेरिकेचा कापूस महाग होतो. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा दर कमी झाल्याचा परिणाम देशातील वायदे बाजारावरही जाणवला.
सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार विश्लेषक, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com