Cotton Rate : कापूस उत्पादक दरवाढीच्‍या प्रतीक्षेत

मागील वर्षी कापसाला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी तालुक्यात सुमारे २२ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली होती.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

मलकापूर, जि. बुलडाणा : मागील वर्षी विक्रमी बारा ते तेरा हजार रुपये प्रतिक्‍विंटल मिळालेल्‍या दरामुळे (Cotton Rate) तालुक्यात कपाशीची यंदा मोठी लागवड (Cotton Cultivation) झाली.

कापसाचे पीकही चांगले झाले. योग्य दर नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून (Cotton Storage) ठेवला आहे. कापूस विक्रीला येत नसल्‍याने यावर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मागील वर्षी कापसाला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी तालुक्यात सुमारे २२ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली होती.

हंगामाच्‍या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने कपाशी जोमात होती. परंतु जुलै-ऑगस्‍ट या दोन्‍ही महिन्‍यांमध्ये पावसाने लपंडाव केल्‍याने पिकाचे नुकसान झाले.

तर परतीच्‍या पावसाने बोंडे सडली. पाने पिवळी पडून नुकसान झाले होते. आलेल्या कापसाची शेतकऱ्यांनी वेचणी करून सध्या पीक साठवून ठेवले आहे.

जानेवारी संपला तरीदेखील अपेक्षित दरवाढ होत नसल्‍याने शेतकरी विक्रीच्या मानसिकतेत नाहीत. जिनिंग, प्रेसिंग उद्योगात हमाली करणाऱ्या मजुरांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

Cotton Rate
Cotton Market : सेलू बाजार समितीत कापूस प्रतिक्विंटल ७२०० ते ८२७० रुपये
मागील वर्षी याच महिन्‍यामध्ये कापसाची विक्री केली होती. वाढीव दर मिळाल्‍याने चांगला भाव मिळेल या आशेपोटी कापूस घरात ठेवलेला आहे. परंतु, दरवाढ होत नसल्‍याने सध्या तरी निराशा झालेली आहे.
अमर जाधव, शेतकरी, घिर्णी.
कापसाला भाव वाढत नसल्‍याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवलेला आहे. कापसाची आवक अल्‍पशा प्रमाणात असल्‍याने खरेदी केंद्रावर तासन्‌तास ताटकळत बसावे लागत आहे. परिणामी काम मिळत नाही.
अशोक भोजने, मजूर, मलकापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com