Cotton Production: कापूस उत्पादन यंदा ३७५ लाख गाठींवर पोचणार?

काॅटन असोसिशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांचा अंदाज
Cotton
Cotton Agrowon

पुणेः देशातील कापूस पिकाला (Cotton Crop) पाऊस आणि कीड-रोगांचा (Cotton Pest Disease) फटका बसत आहे. मात्र काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष (CAI) अतूल गणात्रा (Atul Ganatra) यांनी देशातील कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. गणात्रा यांच्या मते यंदा देशात ३७५ लाख गाठी कापूस उत्पादन (Cotton Production) होऊ शकते. मात्र ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्यास पिकाची गुणवत्ता (Cotton Quality) कमी राहील, असंही त्यांनी सांगितलं.

Cotton
Irrigation techniques: सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना काय काळजी घ्याल?

देशातील काही बाजारांमध्ये नव्या कापासाची (New Cotton Arrival) आवक सुरु झाली. मात्र आवकेचा दबाव (Arrival Pressure) ऑक्टोबर महिन्यापासून वाढण्याची शक्यता आहे. सध्या नव्या कापसाला (Cotton Rate) ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिगाठींचा दर मिळतोय. यंदा देशातील कापूस लागवड (Cotton Sowing) गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ७ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र देशातील महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसतोय. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत कापूस पिकाचं नुकसान होत आहे. तर गुलाबी बोंडअळीचाही प्रादुर्भाव काही भागांत झाला. मात्र काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने देशातील कापूस उत्पादन यंदा वाढेल, असा अंदाज व्यक्त केलाय.

भारतीय सरकी प्रक्रियादार संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना सीएआयचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी कापूस पिकाची स्थिती चांगली असल्याचं म्हटलंय. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नाही तर ३७५ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज गणात्रा यांनी व्यक्त केला. एक कापूस गाठ १७० किलोची असते. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्यास कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असंही गणात्रा यांनी सांगितलं. यंदा उत्पादन वाढेल मात्र मागणी कमी राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. जागतिक मंदीची शक्यता आणि कपड्यांना मागणी घटल्यानं कापसाचा वापर कमी होऊ शकतो, असं व्यापारी आणि उद्योगाचं म्हणणं आहे. त्यामुळं कापसाचा दर कमी झाल्याचा दावाही केला जातोय. कापूस खंडीचे दर १ लाख रुपयांवरून आता ९३ हजारांवर आले आहेत.

Cotton
Cotton Rate : कापूस उत्पादनवाढीचा अंदाज किती खरा?

मागील हंगामात देशात कापसाची ११७ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. तर यंदा दोन सप्टेंबरपर्यंत १२६ लाख हेक्टरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. २०२१-२२ च्या हंगामात देशात देशात ३५५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज होता. मात्र पिकाचं नुकसान होऊन ३१५ लाख गाठीच कापूस हाती आला. देशातील कापसाची उत्पादकता वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देणं गरजेच आहे, असंही गणात्रा म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com