Cotton Market : परभणीत कापूसदर हमीभावापेक्षा कमी

Cotton Rate : गतवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात दर वाढतील या आशेने अद्याप कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Market Update : जिल्ह्यातील कापूस खरेदीचे दर गेल्या दोन दिवसांत आणखी कोसळले आहेत. सेलू, मानवत या कापसाच्या प्रमुख बाजारापेठांमध्ये कापसाचे किमान दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत.

सेलू बाजार समितीत शुक्रवारी (ता. २६) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५९०० ते कमाल ६८९५ रुपये तर सरासरी ६८३० रुपये दर मिळाले. गतवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात दर वाढतील या आशेने अद्याप कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे.

केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी मध्यम धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ६०८० रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ६३८० रुपये एवढी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) जाहीर केली आहे.

Cotton Market
Cotton Bogus Seed : चोपड्यात कापूस बनावट बियाण्याची ९५ पाकिटे जप्त

परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत येथील बाजार समित्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत कापसाचे किमान दर प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपयांहून तर कमाल सात हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. सेलू बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५४०० ते कमाल ६८०५ रुपये तर सरासरी ६७४० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २४) कापसाची ३२४७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्वंटल किमान ६००० ते कमाल ७०८५ रुपये तर सरासरी ७०३० रुपये दर मिळाले. मानवत बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५३०० ते कमाल ६८३५ रुपये तर सरासरी ६७०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २४) कापसाची ४०५२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५५०० ते कमाल ६९५० रुपये तर सरासरी ६८५० रुपये दर मिळाले.

Cotton Market
HTBT Cotton : गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत अवैध ‘एचटीबीटी’चे दलाल सक्रिय

मागील दीड ते दोन महिन्यांपासून परभणी जिल्ह्यात कापसाच्या दरात सुधारणा नाही. किमान व कमाल दरात घसरण कायम आहे. यंदादेखील कापसाला दहा हजारांहून अधिक दर मिळतील अशी बहुतांश शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु जानेवारीच्या सुरुवतीला किमान दर साडेसात हजार रुपयांपेक्षा तर कमाल दर साडेआठ हजार रुपयांपेक्षा अधिक होते. परंतु त्यानंतर दरात घसरण सुरू झाली.

एप्रिलमध्ये सुरुवातीचे काही दिवस दर आठ हजारांवर गेले होते. परंतु फार काळ कायम राहिले नाहीत. मे महिन्यात किमान दर सहा हजार रुपयांपेक्षा तर कमाल दर सातहजार रुपयांहून कमी झाले आहेत. दरात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. घसरण कायम आहे. त्यामुळे सध्या शेतकरी मिळेल त्याभावात कापूसविक्री करत असल्यामुळे आवकेत मोठी वाढ झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com