Cotton Rate: कापसाचे दर वाढले; कुठं मिळाला सर्वाधिक दर?

आज सर्वात आधी देशातील कापूस बाजाराविषयी चर्चा करू… चालू आठवड्यात कापूस बाजारात मोठ्या उलथा पालथी पाहायला मिळाल्या.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

कापूस बाजारात (Cotton Market) आज शेतकऱ्यांना दिलासा देणारी घटना घडली. आज अनेक बाजारांंमध्ये कापूस दरात (Cotton Rate) सुधारणा पाहयला मिळाली. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार कायम असून आज वायद्यांमध्ये वाढ झाली होती.

आज सर्वात आधी देशातील कापूस बाजाराविषयी चर्चा करू… चालू आठवड्यात कापूस बाजारात मोठ्या उलथा पालथी पाहायला मिळाल्या. सोमवारी कापसाचे दर मोठ्या प्रमाणात तुटल्यानंतर आज कालपपासून काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.

आज कापसाचे दर अनेक बाजारात क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयाने वाढले होते. तर देशातील कापूस दराची सरासरी पातळी ७ हजार ५०० ते ८ हजार ८०० रुपांपर्यंत पोचली. देशातील बाजारात दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्रीही कमी केली होती. त्यातचं उद्योगांकडून मागणी आहेच. त्यामुळं दर सुधारल्याचं सांगितलं जातं.

आता राज्यात काय दर मिळाले ते पाहू…तर राज्यातही आज कापसाच्या दरात वाढ पाहायला मिळाली. कापसाला आज ७ हजार ३०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळला. राज्यातील कमाल दरात आज ५०० रुपये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

आज अकोट बाजार समितीत कापसाला ८ हजार ७३० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. हा कापूस एक गाडीमधील कापसाला मिळाला. तसंच हा दर कमाल होता. सर्वच शेतकऱ्यांना हा मिळाला नाही. सर्वसाधारण दर यापेक्षा कमी होते. पण कापसाचे भाव वाढले हे सांगण्यासाठी याचा उल्लेख केला आहे. 

आता आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांविषयी पाहू… तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरातील चढ उतार सुरुच आहेत. आज वायद्यांमध्ये कापसाचे दर वाढून ८३.८७ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. रुपयात हा दर १५ हजार ३१० रुपये होतो. कालच्या तुलनेत दर आज वाढले होते.

Cotton Rate
Cotton Export : आता वाढवा कापसाची निर्यात

आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढील महिन्यात चीनकडून कापसाला मागणी वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम जानेवारीमध्ये बाजारावर दिसू शकतो. त्यातच देशातील बाजारात कापसाची आवक काहीशी कमी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळं देशातील कापूस बाजाराला आधार मिळू शकतो.

तसंच एमसीएक्सवर सध्या कापसाचे वायदे उपलब्ध नाहीत. मात्र जानेवारीत फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे वायदे येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. सेबी आणि एमसीएक्स वायद्यांच्या अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करत आहेत. त्याचं काम सुरु असल्याचं पुन्हा एकदा सांगण्यात आलं. पण जानेवारीत वायदे सुरु झाले तरी त्याचा मानसिक आधार बाजार मिळू शकतो.

मागील चार दिवसांपूर्वी तुटलेला बाजार आज सुधारण्यास सुरुवात झाली. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून बाजारात आणखी सुधारणा होऊ शकते. फक्त यात सरकारनं खोडा घालायला नको. चालू हंगामात कापसाला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळू शकतो. ही दरपातळी लक्षात ठेऊन शेतकरी विक्रीचं नियोजन करु शकतात.

मात्र आपल्यापैकी काही शेतकरी असेही आहेत की ज्यांना लागेच कापूस विकण्याची गरज आहे. म्हणजेच कापूस विकल्याशिवाय पर्यायच नाही. त्यांनी सध्याच्या परिस्थितीत किमान आठ हजार ते साडेआठ हजारांचं टार्गेट ठेवावं, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com