Cotton Market : परभणी जिल्ह्यात कापूस दर दबावातच

सेलू बाजार समितीत शुक्रवारी (ता. १०) कापसाची १८२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ७८८५ रुपये तर सरासरी ७८६० रुपये दर मिळाले.
Cotton Market Update
Cotton Market UpdateAgrowon

Cotton Market Update परभणी ः जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १४) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६८९० ते कमाल ७८२५ रुपये तर सरासरी ७७६० रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत शुक्रवारी (ता. १०) कापसाची १८२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ७८८५ रुपये तर सरासरी ७८६० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ९) १८२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७९४५ रुपये तर सरासरी ७८८० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ८) १२५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७२०० ते कमाल ७९९५ रुपये तर सरासरी ७९६५ रुपये दर मिळाले.

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. १३) कापसाची १९७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७८०० रुपये तर सरासरी ७७५० रुपये दर मिळाले.

Cotton Market Update
Cotton Dust Mites : साठवणीतील कापसात वाढतात ‘डस्ट माइट्‍स’

शनिवारी (ता. ११) ४२२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७८८५ रुपये तर सरासरी ७८०५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १०) ३९६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७८८५ रुपये तर सरासरी ७८०५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ९) कापसाची २१६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७९४५ रुपये तर सरासरी ७८५० रुपये दर मिळाले.

Cotton Market Update
Cotton Arrival : तूर, हरभरा, कापसाची वाढती आवक

कापूस साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान

जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होत नाही. बुधवारपासून (ता. ८) किमान दर सात हजार रुपये तर कमाल दर आठ हजार रुपयांपेक्षा कमी आहेत.

दर आणखी कमी होतील या भीतीमुळे शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस विक्रीसाठी काढला आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. फरदड कापसाची आवक होत आहे. किमान दहा हजार रुपये दर मिळतील या अपेक्षने कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे दर कमी झाल्यामुळे नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com