Milk : ‘दूधपंढरी’चा गाईचा दूध खरेदी दर ३५ रुपयांवर

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने (दूध पंढरी) गाईच्या दूध खरेदी दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. गाईच्या दूधाला प्रतिलिटर ३५ रुपये इतका खरेदी दर जाहीर करण्यात आला आहे.
Milk Rate
Milk RateAgrowon

सोलापूर ः ‘‘सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने (Solapur District Milk Producer And Processor Organization) (दूध पंढरी) गाईच्या दूध खरेदी दरात (Milk Purchase Rate) पुन्हा एकदा वाढ केली आहे. गाईच्या दूधाला (Milk) प्रतिलिटर ३५ रुपये इतका खरेदी दर जाहीर करण्यात आला आहे. रविवारपासून (ता. २१) या दराची अंमलबजावणीही सुरु झाली आहे,’’ अशी माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली.

Milk Rate
Milk Rate : ‘अमूल, मदर डेअरीकडून दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. बैठकीनंतर शिंदे यांनी ही माहिती दिली. शिंदे म्हणाले, ‘‘दूध व्यवसायातील अडचणी आणि वाढणारी स्पर्धा लक्षात घेत संघ वाटचाल करत आहे. गेल्या काही वर्षांपासून संघाचे दूध संकलन घटले होते. पण आम्ही संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. काही निर्णय त्यासाठी घेत आहोत. खरेदीदर वाढवणे, हा त्याचाच भाग आहे.’’

Milk Rate
Milk Rate : गाय दुधाच्या विक्रीदरातवाढ; खरेदीदर ‘जैसे थे’

‘‘सध्या प्रतिदिन ५० हजार लिटर दूध संकलन आहे. आम्ही हे संकलन दुपटीने एक लाख लिटरपर्यंत वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. संघाच्या मालकीचा बार्शीतील पशुखाद्य कारखाना भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रक्रियाही राबवली. पण अपेक्षित भाडे मिळत नसल्याने आता स्वतः संघच हा कारखाना चालवणार आहे. येत्या आठवडाभरात याबाबत काम सुरू होईल,’’ असेही शिंदे म्हणाले.

आठ महिन्यांत पाच वेळा दरवाढ

सोलापूर जिल्ह्यात एक जानेवारी रोजी गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर २६ रुपये होता. फेब्रुवारीमध्ये पुन्हा दीड रुपयांनी दर वाढवत २७ रुपये ५० पैसे करण्यात आला. एक मार्चला पुन्हा ५० पैशांची वाढ करून २८ रुपये करण्यात आला. तर मे महिन्यात तो ३३ रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. आता पुन्हा त्यात दोन रुपयांची वाढ करून प्रतिलिटर ३५ रुपये दर करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com