
मेहुणबारे, जि. जळगाव ः कापसाचे भाव कमी असल्याने (Cotton Rate) शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून (Cotton Storage) ठेवला आहे. यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाली असून, त्याचा परिणाम बाजारपेठेतील व्यवहारावर (Cotton Market) देखील होत आहे.
आर्थिक व्यवहार मंदावले असून, ग्रामीण भागात शेतकरी (Cotton Producer Farmer) उधार-उसनवार करून किंवा पाच पंचवीस किलो कापूस कवडीमोल भावात विकून उदारनिर्वाह करीत आहेत.
जळगाव जिल्हा किंवा खानदेशात शेती हा व्यवसाय प्रमुख आहे. सुवर्ण बाजार, पाइप उद्योग व इतर बाजारपेठ शेतीवरच अवलंबून आहे.
शेतकऱ्यांकडे पैसा आला तर बाजारपेठेत उलाढाल वाढते. खानदेशात १४ लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी तब्बल नऊ लाख हेक्टरवर कापूस पीक असते.
पांढरे सोने म्हणून कापसाची ओळख आहे. गतवर्षी कापसाने दरात विक्रमी उच्चांक गाठला. कापूस हंगामाच्या शेवटी तर हा दर १२ ते १३ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता.
पण त्या वेळी कमी किंवा अपवादानेच हा दर शेतकऱ्यांना मिळाला. यंदाही चांगला दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली.
सुरवातीला कापसाचा दर बऱ्यापैकी होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही अपेक्षा उंचावल्या होत्या.
दिवाळीनंतर कापसाच्या भावात तेजी येते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कापसाच्या खरेदीला खऱ्या अर्थाने वेग येतो. गावागावांत कापूस व्यापारी खेडा पद्धतीने कापूस खरेदी करतात.
मात्र यंदा जानेवारी संपण्याच्या मार्गावर असला तरी कापसाला भाव नाही. किमान १० हजार रुपये भाव कापसाला हवा आहे.
कारण एक क्विंटल कापसासाठी साडेचार हजार रुपये खर्च आला आहे शेतकरी कापूस विक्री टाळत आहेत. यामुळे बाजारही ठप्प आहे.
कापूस चोरीचे सत्र थांबेना...
ग्रामीण भागात सध्या अद्यापही कापूस शेतकऱ्यांनी घरातच ठेवल्याने शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही, अशी स्थिती आहे.
परिणामी, बाजारपेठेतील खरेदी विक्रीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. आर्थिक व्यवहार मंदावल्याने याचा व्यापाऱ्यांना देखील फटका बसला असून, बियाणे-खते विकी करणाऱ्या दुकानदारांच्या उधाऱ्या देखील ठप्प आहेत.
एकूणच कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेने शेतकऱ्यांसह बाजारपेठांतील आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे. दुसरीकडे कापूस चोरीचे प्रकार वाढले आहेत.
नगरदेवळा येथे नुकताच दोन शेतकऱ्यांचा २८ क्विंटल कापूस शेतातील गोदामातून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. एकापाठोपाठ एक अशा घटना सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.