Heat Wave : युरोपियन युनियनमध्ये पिकांना अतिउष्णतेचा फटका

युरोपियन युनियनमधून गहू, बार्ली आणि मक्याची निर्यात होते. गहू निर्यातीत या देशांचा वाटा सर्वाधिक आहे. युरोपियन युनियनमधील देशांतील हवामानाची स्थिती काय राहते, यावर गहू आणि मक्याचा जागतिक पुरवठा अवलंबून आहे.
Wheat
WheatAgrowon

पुणेः युरोपियन युनियनमधील देशांतील पिकांना यंदा अतिउष्णता (Extreme Heat In European Union) आणि कमी पावसाचा (Rain) फटका बसतोय. त्यामुळे गहू (Wheat), बार्ली (Barli), मका (Maize), सोयाबीन (Soybean), मोहरी (Mustard) आणि सूर्यफूल (Sunflower) या पिकांचे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

युरोपियन युनियनमधून गहू, बार्ली आणि मक्याची निर्यात होते. गहू निर्यातीत या देशांचा वाटा सर्वाधिक आहे. युरोपियन युनियनमधील देशांतील हवामानाची स्थिती काय राहते, यावर गहू आणि मक्याचा जागतिक पुरवठा अवलंबून आहे. मागील हंगामात यरोपियन युनियनमधून जवळपास ३०० लाख टन गहू निर्यात झाला होता. तर ऑस्ट्रेलियाने २७५ लाख टनांची निर्यात केली. यावरून या देशांचं जागतिक बाजारातील महत्व लक्षात येते.

Wheat
Soybean : सोयाबीन हंगामात दडलंय काय?

मात्र यंदा युरोपियन युनियनमधील अनेक देशांना अति उष्णतेचा फटका बसतोय. अनेक देशांत १९९० नंतरचे सर्वाधिक तापमान सध्या आहे. अतिउष्णतेमुळे गहू, बार्ली, मका, सोयाबीन, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांवर परिणाम होत आहे. माॅनिटरींग अॅग्रिकल्चर सर्व्हिसेस अर्थात एमएआरएस या संस्थेने युरोपियन युनियनमधील वसंत ऋतुतील पीक उत्पादनाच्या अंदाजात कपात केली आहे. तर हिवाळ्यातील पिकांवरही उष्णतेचा परिणाम होऊ शकतो, असं संस्थेच्या अहवालात नमूद केलं आहे.

Wheat
Wheat export: गहू निर्यातबंदीवर चीनने घेतली भारताची बाजू

एमएआरएसने नुकताच जुलै महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात उष्णतेमुळे पिकांचं नुकसान होत असल्याचं म्हटलंय. युरोपियन युनियनमधील महत्वाच्या उत्पादक देशांना अतिउष्णतेचा फटका बसतोय. त्यामुळं या देशांमधील मका, सूर्यफूल आणि सोयाबीन उत्पादन सरासरीपेक्षा ८ ते ९ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे.

वसंत ऋतुतील पिकांना याचा सर्वाधिक फटका बसतोय. स्पेन, उत्तर फ्रान्स, मध्य आणि उत्तर इटली, मध्य जर्मनी, उत्तर रोमानिया, पूर्व हंगेरी, पश्चिम आणि दक्षिण युक्रेन या देशांमधील पिकांवर अति उष्णतेचा परिणाम होतोय. मागील ३२ वर्षांतील उच्चांकी तापमान आणि पावसाचं घटलेलं प्रमाण याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेमुळं जलाशयांमधील पाणीसाठाही कमी झाला. त्यामुळं पिकांना सिंचनासाठी पाणी मिळत नाहीये. जुलै महिन्यात अनेक देशांमधील पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. परंतु उष्णतेमुळे फुलगळ वाढली. परिणामी या देशांतील पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com