Gold Rate : सुवर्ण बाजार तेजाळला

दिवाळी सणाला शहरातील सुवर्ण बाजार लाभदायी ठरला आहे. एकट्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा उच्चांक झाला. एकाच दिवसात शहरासह जिल्ह्यात ५० किलोपेक्षा अधिक सोन्याची विक्री झाली.
Gold Rate
Gold RateAgrowon

जळगाव ः दिवाळी सणाला (Diwali Festival) शहरातील सुवर्ण बाजार (gold Market) लाभदायी ठरला आहे. एकट्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर (Dhantrayodashi) सोने खरेदीचा उच्चांक झाला. एकाच दिवसात शहरासह जिल्ह्यात ५० किलोपेक्षा अधिक सोन्याची विक्री झाली. सुमारे २५० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

मोठ्या शोरूममध्ये तर ग्राहक सोने खरेदीसाठी ‘वेटिंग’वर दिसून आले. शोरूमध्ये प्रचंड गर्दी होती. तब्बल दोन वर्षांनंतर धनत्रयोदशीला एवढ्या मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. दिवाळीत येणाऱ्या धनत्रयोदशीला नवीन सोने खरेदीने वर्षभर सुवर्ण खरेदीचा योग येतो, असे सांगितले जाते.

Gold Rate
Indian Agriculture : शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

जळगावचा सुवर्ण बाजार राज्यासह इतर भागात प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेश, गुजरात, विदर्भातील ग्राहकही जळगावात सोने खरेदीसाठी येतात. सुवर्णरूपी धनाची, पैशांची पूजा केली जाते. धन्वंतरी जयंती असल्याने धन्वंतरी देवतेची आराधना करून सुदृढ आरोग्याची मनोकामना केली जाते. यामुळे धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुवर्ण बाजारात सोन्याचे विविध प्रकारचे आकर्षक दागिने, फॅन्सी दागिने, मणी मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी, ब्रेसलेट आदींना मोठी मागणी होती. काहींनी सुवर्ण चीपही खरेदी केल्या. सोमवारी (ता. २४) सकाळपासून सर्वच सुवर्ण दुकानांत गर्दी असल्याचे चित्र होते.

Gold Rate
Agricultural Laborers : भात कापणीसाठी कामगार मिळेना

दरात वाढ, तरीही खरेदीला पसंती

सोन्याचा दर सोमवारी ५१ हजार ३०० अधिक जीएसटी, असा ५२ हजार ८३९ रुपये प्रतितोळा होता. रविवारची (ता.२३) दर विना जीएसटी ५० हजार ३०० होता. आता त्या दरात एक हजाराची वाढ झाली असली तरी सोने खरेदी तुफान झाली. चांदीचा दर रविवारी ५७ हजार प्रतिकिलो होता. सोमवारी ५९ हजार रुपये प्रतिकिलो (जीएसटी विना) दर होता. तब्बल दोन हजारांची वाढ चांदीच्या दरात झाली आहे.

फराळासह इतर खरेदीचाही उच्चांक

सोने-चांदी सोबतच तयार फराळाला बाजारात मोठी मागणी होती. २४० रुपये किलोपासून चारशे रुपये प्रतिकिलो दराने फराळ उपलब्ध होता. मिठाई चारशे रुपयांपासून एक हजार रुपये प्रतिकिलो उपलब्ध होती. लक्ष्मीपूजनासाठी लागणारी लहान केरसुणी, लक्ष्मीचा फोटो, साळीच्या लाह्या, बत्तासे, विविध प्रकारची फळे, उसाला मोठी मागणी होती. सोमवारी जळगाव शहराचा मोठा बाजार असतो. नागरिक साप्ताहिक खरेदीसाठी शहरात येतात. दिवाळीची खरेदीसाठी बहुतांश ग्राहक बाजारपेठेत असल्याने गर्दीचा उच्चांक झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com