Fertilizer Rate : खताची किंमत कमी करण्याचा निर्णय रातोरात रद्द

‘इफ्को’चे विपणन संचालक योगेंद्र कुमार यांनी सात ऑक्टोबरला एका आदेशान्वये या श्रेणीची किंमत कमी करण्याचे आदेश देशातील सर्व कार्यालयांना दिले होते.
Fertilizer Rate
Fertilizer Rate Agrowon

पुणे ः संयुक्त रासायनिक खतांमधील (Chemical Fertilizer) २०ः२०ः०ः१३ या श्रेणीची कमाल किरकोळ किंमत (Fertilizer Rate) (एमआरपी) गोणीमागे आता १५० रुपयांनी कमी निर्णय इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (Indian Farmers Fertilizers Co-Operative Ltd.) (इफ्को) (IFFCO) कंपनीने रातोरात मागे घेतला. त्यामुळे दराबाबत रब्बी हंगामाच्या (Rabi Season) तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता मावळली आहे.

Fertilizer Rate
Seeds And Fertilizers : बियाणे, खतांचा तुटवडा नाही

‘इफ्को’चे विपणन संचालक योगेंद्र कुमार यांनी सात ऑक्टोबरला एका आदेशान्वये या श्रेणीची किंमत कमी करण्याचे आदेश देशातील सर्व कार्यालयांना दिले होते. त्यामुळे २०ः२०ः०ः१३ खताची ५० किलोची गोणी शेतकऱ्यांना १२५० रुपये दराने उपलब्ध होणार होती. मात्र, इफ्कोने काही तासांत हा निर्णय फिरवला.

‘‘दर कमी करण्याबाबत आधी पाठवलेले पत्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या खताची विक्री किंमत नेहमीप्रमाणे १४०० रुपयेच ठेवा,’’ असे दुसरे पत्र जारी करण्यात आले आहे.

Fertilizer Rate
Fertilizer import : भारत १५ लाख टन पोटॅशची आयात करणार

‘‘इफ्कोने खताची किंमत कमी केल्यानंतर इतर सरकारी अंगीकृत व खासगी खत कंपन्यांनादेखील या श्रेणीची किंमत कमी करावी लागण्याची शक्यता होती. मात्र, दर उतरविण्याचा निर्णय अचानक कोणाच्या सांगण्यावरून व कशासाठी कमी करण्यात आला याविषयी आमच्याकडे माहिती नाही,’’ असे असे ‘इफ्को’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

इफ्कोने देशात तयार होणाऱ्या तसेच आयात केलेल्या अशा दोन्ही श्रेणीसाठी २०ः२०ः०ः१३ चे दर कमी ठेवण्याची घोषणा केली होती. तसेच, ही श्रेणी विकणाऱ्या वितरकांचा मूल्यवाटा (डिस्ट्रिब्युटर मार्जिन) आता ४८० रुपये प्रतिटन राहील, असे नमुद केले होते. परंतु, आता सारे मुसळ केरात गेले आहे.

रब्बीमध्ये या श्रेणीचे खत शेतकऱ्यांना आधीच्याच जादा दराने घ्यावे लागणार आहे. राज्यात साधारणतः ५१ लाख हेक्टरवर रब्बी हंगामाचा पेरा होतो. मात्र, चांगल्या पाणी साठ्यामुळे यंदा गहू व हरभऱ्याच्या पेरण्या वेगाने होतील. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी २०२० मधील रब्बीच्या तुलनेत या दोन्ही पिकांचा पेरा जास्त केला होता. यंदाही पेरा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयुक्त खताला मागणी राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

जादा दरानेच घ्यावे लागणार खत

‘‘संतुलित वापर वाढण्यासाठी शेतकऱ्यांना कमी किमतीत २०ः२०ः०ः१३ श्रेणी उपलब्ध करून देण्याची गरज होती. या श्रेणीत १३ टक्के गंधक असल्यामुळे विशेषतः भाजीपाला तसेच रब्बी ज्वारी, हरभरा पिकांसाठी या श्रेणीचा वापर केला जातो. परंतु, इफ्को कंपनीने निर्णय धक्कादायकपणे मागे घेतला. परिणामी, आधीच्याच जादा दरानेच खत विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणली आहे,’’ अशी माहिती खत उत्पादक सूत्रांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com