Soybean Cotton Market : कापूस, सोयाबीन, मक्याची आवक घटली; कांद्याचे दर अजूनही दबावात

मार्च महिन्यात कापसाची आवक कमी झाली होती. मका, मूग व सोयाबीन यांचीही आवक घटली होती.
Soybean Maize
Soybean MaizeAgrowon

फ्यूचर्स किमती: सप्ताह ८ ते १४ एप्रिल २०२३

Soybean Cotton Maize Market Update : या सप्ताहात मूग वगळता सर्व वस्तूंच्या किमती कमी झाल्या. मक्याच्या किमती गेल्या सप्ताहात ९.४ टक्क्यांनी घसरल्या होत्या.

या सप्ताहात त्या पुन्हा १३ टक्क्यांनी घसरल्या. मुगाच्या किमती स्थिर होत्या. कांद्याचे दर अजूनही सावरले नाहीत. मार्च महिन्यात कापसाची आवक (Cotton Arrival) कमी झाली होती. मका, मूग व सोयाबीन (Soybean Arrival) यांचीही आवक घटली होती.

हळदीने साप्ताहिक २१ हजार ५०० रुपयांची पातळी गाठली होती; आता ती कमी होऊ लागली आहे. हरभरा व कांदा यांची आवक मात्र वाढत आहे. कांद्याच्या किमतीतील घट अजूनही थांबलेली नाही.

१४ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात १.९ टक्क्यांनी वाढून रु. ६२,५४० वर आले होते. या सप्ताहात ते याच पातळीवर आहेत.

जून फ्यूचर्स भाव १ टक्क्याने घसरून रु. ६४,२४० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स रु. ६३,००० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.७ टक्क्याने अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५९९ वर आले होते. या सप्ताहात ते १.४ टक्क्याने घसरून रु. १,५७६ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५६० वर आहेत.

कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत. किमती आता वाढत आहेत. आवक कमी होत आहे. किमतीतील वाढता कल पुढेही कायम राहण्याचा संभव आहे.

Soybean Maize
Soybean In Diet : सोयाबीन हे केवळ तेलबिया पीक नव्हे तर ते एक पौष्टिक खाद्यान्न

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या महिन्यात घसरत आहेत. या सप्ताहात त्या १३ टक्क्यांनी घसरून रु. १,९५० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (मे डिलिव्हरी) किमतीसुद्धा १३.१ टक्क्यांनी घसरून रु. २,००५ वर आल्या आहेत.

जुलै फ्यूचर्स किमती रु. २,०२९ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. रब्बी मक्याची आवक सुरू झाली आहे. त्याचा परिणाम किमतींवर दिसून येत आहे.

Soybean Maize
Maize Rate : खानदेशात मकादर १८५० ते २२०० रुपये

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती मार्च महिन्यात रु. ६,७९० ते रु. ७,००० या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या.

गेल्या सप्ताहात त्या रु. ६,९५६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी घसरून रु. ६,७७१ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती १.७ टक्क्याने घसरून रु. ६,९०८ वर आल्या आहेत.

जून फ्यूचर्स किमती रु. ६,९५० वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या २.७ टक्क्यांनी अधिक आहेत. आवक गेल्या महिन्याच्या मध्यापर्यंत वाढत होती; नंतर ती कमी झाली. ७ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात मात्र ती पुन्हा वाढली.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १ टक्का वाढून रु. ४,९५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३ टक्के घसरून रु. ४,८०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. आवक वाढू लागली आहे. सध्या ती साप्ताहिक एक लाख टन आहे. त्याचा परिणाम किमतींवर दिसतोय.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती मार्च महिन्यात घसरत होत्या. मात्र या महिन्यात त्या वाढू लागल्या आहेत. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) १.४ टक्क्याने वाढून रु. ५,५०५ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती ०.९ टक्क्याने घसरून रु. ५,४५४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात रु. ८,०६० वर आली आहे. हमीभाव रु. ६,६०० आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com