ग्रामीण भागामध्ये सोन्याच्या मागणीत घट

शुक्रवारी भारतीय सोन्याच्या किंमतीमध्ये उच्चांकी वाढ पाहायला मिळाली. मात्र चालू आठवड्यात भारतामध्ये सोन्याच्या मागणीमध्ये घट होईल, असा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामीण भागामध्ये सोन्याच्या मागणीत घट
Gold DemandAgrowon

शुक्रवारी भारतीय सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price) उच्चांकी वाढ पाहायला मिळाली. मात्र चालू आठवड्यात भारतामध्ये सोन्याच्या मागणीमध्ये घट होईल, असा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे आणि त्याचबरोबर लग्नसराईचा हंगाम (Weeding Season) संपल्यामुळे या आठवड्यात सोन्यावरील सवलतीमध्ये वाढ करण्यात येईल.

पुढील काही दिवसांमध्ये सोन्याची ग्रामीण भागातील मागणीही कमी होईल, कारण पावसाळा आल्यामुळे शेतकरी शेतातील कामांकडे वळतील, ज्यामुळे ग्रामीण भागातील सोन्याच्या मागणीत घट होण्याची शक्यता व्यापारी सांगत आहेत.

भारतीय व्यापाऱ्यांनी सोन्याच्या देशांतर्गत किंमतीवर या आठवड्यात ९ औंसपर्यंत सवलत दिली आहे. तर गेल्या आठवड्यात ५ औंसपर्यंत सवलत देण्यात आली होती. ज्यामध्ये १०.७५ आयातशुल्क आणि ३ टक्के विक्री शुल्काचा समावेश होता.

दरम्यान, २००७ नंतर सोन्याच्या खाणीमध्ये दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत जगात सर्वाधिक सोने निर्माण करणाऱ्या चीनमध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र या आठवड्यात चीनमधील लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. मात्र अजूनही सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी आहे. कोविड-१९ चा प्रभाव कमी झाला नाही तर २०२२ मध्ये चीनमधील सोन्याच्या किंमतीमध्ये १४.१ टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्याचा परिणाम जगभरातील सोन्यांच्या बाजारपेठेवर होईल अशी भिती असल्यामुळे सोन्याचे विक्रेत्यांनी साठा करण्यासाठी नकार दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com