Vegetable Market : नगरमध्ये भाजीपाल्याच्या आवकेत घट

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. बाजार समितीत दर दिवसाला एक हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon

नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagar APMC) मागील आठवड्यात भाजीपाल्याची आवक (Vegetable Arrival) कमी झाली आहे. बाजार समितीत दर दिवसाला एक हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. त्यात बटाट्याची चारशे क्विंटलपर्यंत बटाट्याची आवक (Potato Arrival) होत आहे. पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली असून दरात सुधारणा झाली आहे.

Vegetable Market
Vegetable Market : नुकसानीमुळे भाजीपाला आवक घटली

नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने पाऊस सुरु आहे. पावसामुळे मागील आठवड्यात भाजीपाल्याची आवक कमी झाली. मागील आठवड्यात दर दिवसाला टोमॅटोची १५० क्विंटलपर्यंत आवक झाली. टोमॅटोला प्रती क्विंटल ५०० ते १५०० रुपयांचा दर मिळाला. वांगीची २५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते अडीच हजार रुपयाचा दर मिळाला. फ्लॉवरची ३२ क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते २०००, कोबीची ३५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ८०० ते १८००, काकडीची ४५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ६०० ते १८००, गवारची १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ३५०० ते १०,०००, घोसाळेची ३ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते साडेतीन हजार, दोडक्याची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन दीड हजार ते तीन हजार ५००, भेंडीची ३० क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते तीन हजार, वाल शेंगाची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन साडेतीन हजार ते चार हजार, घेवड्याची २ ते ३ क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार पाचशे ते साडे तीन हजार वाटाण्याची ४ क्विंटलपर्यंत आवक होऊन ८००० ते ९०००, बटाट्याची ४०० क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते २४००, लसणाची ३० क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते ८०००,

Vegetable Market
Vegetable Market Rate : सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर

हिरवी मिरचीची १०० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ३५०० व सिमला मिरचीची १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ९०० ते ३ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. शेवग्याची १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५ हजार ते १० हजाराचा प्रती क्विंटलपर्यंत दर मिळाला. पालेभाज्यात पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, करडीभाजी, याला मागणी राहिली, मात्र पावसामुळे आवक कमी होती.

ज्वारीची अजूनही आवक नाही

बाजार समितीत भुसारमध्ये काहीशी ज्वारीची आवक सुरु झाली असली तरी दरवर्षीच्या तुलनेत अजूनही फारशी आवक नाही. ज्वारीला प्रती क्विंटलला २१०० ते २४०० रुपयांचा दर मिळत आहे. बाजरीला १८५० ते २२००, तुरीला ५ हजार, हरभऱ्याला ३६०० ते ४२५०, गव्हाला २२३० ते २५००, मुगाला ५ हजार ते ७ हजार ५००, सोयाबीनला ५०५० ते ५२०० रुपयांचा दर मिळत आहे. मुगाची आवक वाढत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com