Banana Market : खानदेशात केळी आवकेत घट

खानदेशात केळीची आवक मागील २० ते २२ दिवसांत आणखी घटली असून, दरही स्थिर आहेत. कांदेबाग केळीची काढणी अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. कमाल दर १६०० व किमान दर १३००, तर सरासरी १००० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे.
Banana Rate
Banana RateAgrowon

जळगाव ः खानदेशात केळीची आवक (Banana Arrival) मागील २० ते २२ दिवसांत आणखी घटली असून, दरही स्थिर आहेत. कांदेबाग केळीची काढणी (Banana Harvesting) अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. कमाल दर १६०० व किमान दर १३००, तर सरासरी १००० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे.

ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत प्रतिदिन सरासरी १६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक खानदेशात झाली. त्यात मागील दोन आठवड्यांत आणखी घट दिसली असून, सध्या प्रतिदिन सरासरी १३० ट्रक केळीची आवक झाली आहे. पण दरात हवी तशी वाढ झालेली नाही.

सध्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा व शहादा भागात पिलबाग (खोडवा) व जुनारी (काढणी ८० टक्के पूर्ण झालेली केळी बाग) केळी बागांत काढणी सुरू आहे. कांदेबाग केळी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव, भडगाव, पाचोरा आदी भागांत अधिक असते.

या केळीची काढणी ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी होती. मागील १५ दिवसांत कांदेबाग केळी बागांतील केळीची आवक घटली आहे. कारण या बागांतील काढणी जवळपास १०० टक्के झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीतून काढणी काही भागात सुरू आहे. पण या बागांतही आवक फारशी नाही. रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबार जिल्ह्यात नवती किंवा जून, जुलै व ऑगस्टमध्ये लागवडीच्या बागा अधिक असतात. या बागांमधील काढणी किंवा केळीची आवक फेब्रुवारी व मार्चमध्ये सुरू होईल.

अर्थात, सध्या हवी तेवढी केळी काढणीवर खानदेशात नाही. यामुळे आवक घटली आहे. पंजाब, काश्मीर, दिल्ली आदी भागांत केळीची पाठवणूक अल्प प्रमाणात सुरू आहे. तेथे बॉक्समध्ये पॅकिंग करून केळी पाठविली जात असून, या केळीला प्रतिक्विंटल १६०० ते १७०० रुपये दर आहे.

तर छत्तीसगड, राजस्थान, राज्यातील नागपूर, मुंबई, ठाणे आदी भागांत पाठविल्या जाणाऱ्या केळीला १३००, १२००, १००० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची आवक कमी आहे. तेथे सध्या प्रतिदिन १०० ट्रक केळीची आवक होत आहे. तेथेही दर्जेदार केळीला १६०० व कमी दर्जाच्या केळीला १२०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com