Agriculture Market Rate : मका, मूग, सोयाबीनच्या आवकेत घट

कापसाच्या व्यवहार घातलेली बंदी अजून काढलेली नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर MCX अजून तरी कापसासाठी व्यवहार करता येणार नाहीत.
soybean rate
soybean rate agrowon

फ्यूचर्स किमती ः सप्ताह- १७ ते २३ डिसेंबर २०२२

या सप्ताहात सेबीने (SEBI) जाहीर केल्याप्रमाणे, भात (Paddy) (बासमती शिवाय इतर), गहू, हरभरा, मोहरी (Mustard) व मोहरी उत्पादित वस्तू, सोयाबीन (Soybean) व सोयाबीन उत्पादित वस्तू, पाम तेल व मूग यांच्यावरील डिसेंबर २०२१ मध्ये फ्यूचर्स व्यवहारांवरील घातलेली बंदी डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवलेली आहे. थोडक्यात, NCDEX, MCX व इतर एक्स्चेंजमध्ये या वस्तूंवर पुढील एक वर्ष व्यवहार करता येणार नाहीत.

soybean rate
Soybean Seed : केवळ बीजोत्पादनासाठी घ्या उन्हाळी सोयाबीन

कापसाच्या व्यवहार घातलेली बंदी अजून काढलेली नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर MCX अजून तरी कापसासाठी व्यवहार करता येणार नाहीत. कदाचित, कोविडचा चीन व इतर देशांत नव्याने उद्रेक झाल्यामुळे हे सावधगिरीचे पाऊल उचललेले असू शकते.

या सर्व बंधनांमुळे एकूणच फ्यूचर्स व्यवहारांवरील विश्‍वास कमी होत आहे. NCDEX मध्ये सध्या एरंडी व एरंडी तेल, सरकी पेंड, धणे, गवार बी व गवार गम, गूळ, जीरा, मका, बासमती भात, तीळ व हळद याच शेतीमालांचे व्यवहार करता येतात; MCX मध्ये कापसाखेरीज फक्त मेंथा (पुदिना) तेल यांचे व्यवहार करता येतात. प्रत्यक्ष व्यवहार मात्र यातील सर्व वस्तूंमध्ये होतातच असे नाही.

त्यात शासनाचे धरसोड धोरण असेल तर या व्यवहारांचा फायदा शेतकरी व व्यापारी कोणालाच घेता येणार नाही. त्यातूनही फ्यूचर्स व्यवहारांमुळे अतिरिक्त भाव-वाढ होते असे कोठेच सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या बंदीचा फेर-विचार व्हावा असे बऱ्याच जणांना वाटते. मात्र नजीकच्या काळात तसे होईल याची शक्यता नाही. या महिन्यात कापसाच्या आवकेतील कल वाढता आहे. मका, मूग, सोयाबीन यांची आवक कमी होत आहे. देशातील कांद्याची साप्ताहिक आवक ३.५ ते ४ लाख टनावर स्थिर आहे तर टोमॅटोची साप्ताहिक आवक ७० ते ९० हजार टन आहे.

soybean rate
Maize Rate : या बाजारात मिळाला मक्याला सर्वाधिक दर

डिसेंबर महिन्यात कापसाच्या किमती कमी होत आहेत; तर हरभरा खेरीज इतर सर्वांच्या किमती वाढत आहेत. या सप्ताहात कापसाच्या व तुरीच्या किमती अनुक्रमे ३.१ व २.६ टक्क्यांनी घसरल्या; हळदीच्या किमती १.३ टक्क्याने वाढल्या. कांद्याच्या किमती वाढून रु. १४१७ वर आल्या आहेत तर टोमॅटोच्या रु. ५०० वर आलेल्या आहेत.

soybean rate
Cotton Market : ‘पणन’ला कापूस खरेदीची परवानगी मिळणे धूसर

२३ डिसेंबरपर्यंत रब्बी हंगामातील पाऊस समाधानकारक आहे; सरासरीपेक्षा तो २० टक्क्यांनी अधिक आहे. या सप्ताहामधील किमतींतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) नोव्हेंबर महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.८ टक्क्यांनी घसरून रु. ३१,३५० वर आले होते; या सप्ताहात ते पुन्हा ३.१ टक्क्यांनी घसरून रु. २९,७५० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ३.२ टक्क्यांनी घसरून रु १,६२१ वर आले आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

soybean rate
Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला सरासरी ५३७८ रुपये दर

मका

मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती ०.६ टक्क्याने वाढून रु. २,२३८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.६ टक्क्याने वाढून रु. २,२५० वर आले आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२६२ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२८७ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.९ टक्क्याने वाढून रु. ७,३६४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्याने वाढून रु. ७,४५९ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ८,४६४ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ८,७४२ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने वाढून रु. ५,००७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्याने घसरून रु. ४,९६९ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मूग

मुगाच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,२०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) रु. ५,६५६ वर आली होती; या सप्ताहात ती ०.२ टक्क्याने घसरून रु. ५,६४६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात २.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,९६९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२०० होती; या सप्ताहात ती रु. १,४१७ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४८३ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ५०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची

किंमत प्रति १७० किलोची गाठी;

कपाशीची किंमत प्रति २० किलो).

: arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com