Tur Disease : राज्यात यंदाही तुरीवर वांझ रोगाचे सावट

राज्यात पावसाची स्थिती चांगली असली, तरी पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. सोयाबीनचे ‘येलो मोझॅक’मुळे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. त्यात आता तुरीवर वांझ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसू लागले आहे.
Tur Disease
Tur DiseaseAgrowon

नगर ः राज्यात पावसाची (Rainfall) स्थिती चांगली असली, तरी पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव (Disease On Crop) दिसत आहे. सोयाबीनचे ‘येलो मोझॅक’मुळे (Soybean Yellow Mosaic) बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. त्यात आता तुरीवर वांझ रोगाचा प्रादुर्भाव (Defertigation Disease On Tur Crop) झाल्याचे दिसू लागले आहे.

Tur Disease
Tur Rate : तूर यंदा भाव खाणार

साधारणपणे फुले, शेंगा लागल्याच्या काळात वांझ रोग येतो. परंतु सध्या अनेक भागांत तुरीची पाने पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे साधारण १५ टक्के क्षेत्रावर वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीसारखेच यंदाही तुरीवर वांझ रोगाचे सावट आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड तालुक्यांत कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

Tur Disease
Tur Production : तूर उत्पादन यंदा किती होणार?

राज्यात तुरीचे १२ ते १३ लाखांच्या जवळपास क्षेत्र असते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस काहीसा उशिराने आल्यामुळे तुरीचे क्षेत्र कमी झाले. राज्यात विदर्भ, मराठवाडा, नगर, सोलापूर, नगर, नंदुरबार धुळे, भागात तुरीचे क्षेत्र अधिक असते. गेल्या वर्षी तुरीवर ‘वांझ’ रोगाचा साधारणपणे २० ते २५ टक्के प्रमाणात प्रादुर्भाव होता.

साधारणपणे शेंगा, फुले आल्यावर हा प्रादुर्भाव आढळून आला होता. यंदा त्या आधीच आतापर्यंत १५ टक्के क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. विभागीय कृषी सहसंचालक फिक नाईकवाडी, तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ मस्के यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांनी सोमवारी (ता. १९) कर्जत तालुक्‍यातील चापडगाव परिसरात प्रादुर्भावग्रस्त तुरीच्या पिकांची पाहणी केली.

मदतीसाठी रोहित पवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यांत तुरीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. गेल्या वर्षी वांझ रोगाच्या प्रादुर्भावाचा मोठा फटका बसला. सध्या तुरीचे पीक साधारण तीन ते चार फूट उंचीचे आहे. यावर ‘वांझ’चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पिकांचे पंचनामे करून पीकविमा द्यावा. विमा भरला नाही अशा शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली.

कर्जत-जामखेड तालुक्यांत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव आहे तेथे शंभर टक्के नुकसान होते. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
पद्‍मनाथ मस्के, तालुका कृषी अधिकारी, कर्जत, जि. नगर
‘‘यंदा सततचा पाऊस, आर्द्रतेचे वातावरण हा रोग पसरण्याला कारणीभूत आहे. सुधारित जातीवरही ‘वांझ’चा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शेतावर जाऊन पाहणी करत आहेत.
डॉ. एन. एस. कुटे, प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com