Poultry Industry : राज्यात चिकनला मागणी, मात्र वैयक्तिक उत्पादनात घट

हिवाळ्यामुळे राज्यात चिकनला मागणी वाढत आहे. पोल्ट्री उद्योगातील कंपन्यांचे उत्पादन सुरू असले, तरी वैयक्तिक शेतकऱ्यांकडून होणाऱ्या उत्पादनात वरचेवर घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Poultry Industry
Poultry IndustryAgrowon

नगर ः हिवाळ्यामुळे राज्यात चिकनला मागणी (Chicken Demand) वाढत आहे. पोल्ट्री उद्योगातील (Poultry Industry) कंपन्यांचे उत्पादन (Poultry Production) सुरू असले, तरी वैयक्तिक शेतकऱ्यांकडून होणाऱ्या उत्पादनात वरचेवर घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोल्ट्रीबाबत सातत्याने होणारे अस्थिर वातावरण आणि खाद्याचे दर (Poultry Feed Rate) वाढल्याचा परिणाम पोल्ट्रीवर, शेतकरी करत असलेल्या वैयक्तिक कुक्कुटपालनावर होत आहे. हिवाळ्यामुळे गेल्या महिनाभरापासून अंड्याला मात्र बऱ्यापैकी मागणी असून दरही चांगला आहे.

Poultry Industry
Poultry Farming : अंडी विक्रीसाठी तयार केला ब्रॅण्ड

राज्यात दर महिन्याला साधारणपणे अडीच कोटी कोंबड्याचे उत्पादन होते. महाराष्ट्रात पोल्ट्री उद्योगात सुमारे ९ लाख शेतकरी आहेत. त्यातील एक ते दीड लाख शेतकरी वैयक्तिक कुक्कुटपालन करतात. इतर सुमारे सात ते साडेसात लाख शेतकरी कंपन्यांशी जोडलेले आहेत. एक लाख शेतकऱ्यांकडून महिन्याला वैयक्तिकरीत्या सुमारे वीस ते तीस लाख कोंबड्याचे उत्पादन होते; मात्र गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पोल्ट्रीमधील अस्थिर वातावरणामुळे कुक्कुटपालक सतत अडचणीत येत आहेत.

हिवाळ्यात चिकन, अंड्याला मागणी असते, त्या पार्श्‍वभूमीवर जाणकारांनी सांगितले, की पोल्ट्री उद्योग कंपन्यांच्या हाती असल्याने कंपन्यांकडून नेहमीच्या तुलनेत ८० ते ९० टक्के कुक्कुटपालन उत्पादन सुरू आहे; मात्र वैयक्तिक शेतकऱ्यांकडून मात्र पन्नास टक्केच उत्पादन सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत खाद्याच्या दरात १० ते १२ रुपयांनी वाढ झाली आहे.

Poultry Industry
Poultry : पोल्ट्री व्यवसायावर मंदीचे सावट

वैयक्तिक शेतकऱ्यांना फारसा दर मिळत नाही, शिवाय अचानक पोल्ट्रीवर संकट येत असल्याचा अनुभव घेऊन अडचण आली तरी फार तोटा सोसावा लागणार नाही हे पाहूनच शेतकऱ्यांनी हिवाळा असूनही कुक्कुटपालन सुरू ठेवले आहे. हिवाळ्यात मागणी असूनही साधारणपणे एकूण उत्पादनाच्या २० टक्के घटीने कुक्कुटपालन सुरू आहे.

सध्याची दरस्थिती

ब्रॉयलर जिवंत (ठोक) ८० ते ९० रुपये किलो

ब्रॉयलर किरकोळ १७० ते १८०

गावरान जिवंत (ठोक) १८० ते १९०

गावरान किरकोळ २३० ते २५०

ब्रॉयलर अंडी ठोक (प्रति शेकडा) ५१० ते ५३०

किरकोळ अंडी ६०० ते ६५०

गावरान अंडी (ठोक) ७०० ते ७१०

गावरान अंडी (किरकोळ) ८०० ते ९००

‘गावरान’वर अधिक परिणाम

राज्यात साधारणपणे पन्नास हजारांपेक्षा अधिक शेतकरी गावरान कुक्कुटपालन करतात. दर महिन्याला सुमारे वीस ते पंचवीस लाखांपेक्षा अधिक कोंबड्याचे उत्पादन होते. गावरान कुक्कुटपालनाचा आकडा सातत्याने बदललो. गावरान कोंबडीपालनात नुकसानीचा धोका कमी असला तरी विक्रीसाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागतो. पशुखाद्याचे वाढते दर, त्या तुलनेत दर मिळत नाही. त्यामुळे गावरान कुक्कुटपालनात सध्या चाळीस टक्क्यांनी घट आहे. अंड्याला मात्र मागणी आणि दर चांगला आहे.

पोल्ट्री उद्योगात ‘गावरान’चे स्थान चांगले आहे. वैयक्तिक शेतकरी गावरान कुक्कुट उद्योग करण्यावर भर देतात; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने हा उद्योग अस्थिर आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पोल्ट्री उत्पादन सुरू राहताना दिसत नाही. कुक्कुट उद्योगाला शासनाकडून पाठबळ मिळाले तरच हा उद्योग वाढून शेतकरी विकासाला मदत होईल.
संतोष अंकुश कानडे, अध्यक्ष, नगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com