Paddy Procurment
Paddy Procurment

Paddy : रब्बी धान खरेदी करण्याची मागणी

रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करून त्याचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली आहे.

गोंदिया ः रब्बी हंगामातील धान खरेदी (Rabi Paddy Procurement) सुरू करून त्याचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने (NCP) केली आहे. यासाठी पक्षाच्या वतीने आमगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राच्या (Paddy Procurement Center) माध्यमातून खरीप व रब्बी धानाची (Rabi Paddy) शासकीय दरात खरेदी करण्यात येते.

Paddy Procurment
Paddy Cultivation: भाताने वाढवली चिंता

या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाइन केला. त्यानंतर खरेदी सुरू झाली; परंतु कोटा संपल्याचे जाहीर करून अर्ध्यावरच ती सोडण्यात आली. अनेक शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात आलेच नाही. परिणामी या शेतकऱ्यांसमोर धान विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Paddy Procurment
Paddy : मावळात साडेतेरा हजार हेक्टरवर भात लागवड

‘२२१.५१ कोटीची गरज’

अमरावती ः जिल्ह्यात जुलै महिन्यात ५६ महसूल मंडळात अतिवृष्टीत झाली. त्यामुळे २,५०,२६९ शेतकऱ्यांच्या २,७०,९१० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एसडीआरफच्या निकषापेक्षा जास्त मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

त्या निर्णयानुसार जिल्ह्यास किमान ५०० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्‍यता आहे. जिरायती क्षेत्रात २,११,३०५ शेतकऱ्यांच्या २,०४,७८३ हेक्‍टरमध्ये ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. यासाठी ६८०० रुपये हेक्‍टरप्रमाणे १३९,२५,६१,९३६ रुपयांची गरज भासणार आहे. यामध्ये अचलपूर व अंजनगासुर्जी तालुके निरंक आहेत. या आपत्तीमध्ये १,२७३ शेतकऱ्यांच्या बहुवार्षिक व फळपिकांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com