Turmeric Future Market : हळद ‘एनसीडीईएक्स’च्या वायदे बाजारातून बाहेर काढा

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या हळदीच्या वायदे बाजारात शेतकऱ्यांच्या नावाखाली काही ठराविक लोकच लाभ उठवत आहेत. प्रत्यक्ष खरेदी विक्री न करता केवळ सौदे देऊन कृत्रिम तेजी मंदी करून हळदीचे भाव पाडण्याचे षडयंत्र गेल्या चार-पाच वर्षांपासून होत आहे.
Turmeric
TurmericAgrowon

नांदेड : मराठवाड्यातील हळद (Marathwada Turmeric) ‘एनसीडीईएक्स’च्या जाचक निकषात (Oppressive Criteria) बसत नाही. शेतकऱ्यांची हळद ‘एनसीडीईएक्स’ घेत नाहीत. शेतकऱ्यांच्या नावावर काही ठराविक लोक प्रत्यक्ष व्यापार न करता केवळ तेजी-मंदी करून हळदीचे भाव (Turmeric Rate) पाडत आहेत. म्हणून ‘एनसीडीईएक्स’ वायदे बाजारातून हळदीला बाहेर काढावे, अशी मागणी व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केली आहे.

Turmeric
Turmeric : हळदीवरील करपा, कंदकुज रोगांचे नियंत्रण

खासदार हेमंत पाटील, माजी आमदार गजानन घुगे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड, हिंगोली, वसमत व वाशीम येथील हळद व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्या, अडते यांची बैठक नांदेड येथे शुक्रवारी (ता.२) झाली. मागणीसाठी वेळप्रसंगी मराठवाड्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

Turmeric
Turmeric : हळदीच्या वायद्यांवर बंदी नकोच !

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या हळदीच्या वायदे बाजारात शेतकऱ्यांच्या नावाखाली काही ठराविक लोकच लाभ उठवत आहेत. प्रत्यक्ष खरेदी विक्री न करता केवळ सौदे देऊन कृत्रिम तेजी मंदी करून हळदीचे भाव पाडण्याचे षडयंत्र गेल्या चार-पाच वर्षांपासून होत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, अडते यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शिवाय ‘एनसीडीईएक्स’चे निकष अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील व्यापाऱ्यांचा, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा व शेतकऱ्यांचा माल उत्तीर्ण होत नाही.

देशातील हळदीच्या उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन हे मराठवाडा, विदर्भात होते. त्यामुळे ‘सेन्सेक्स’ने आपले निकष बदलून विदर्भ मराठवाड्यातील हळद केंद्रस्थानी ठेवून निकष करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होइल, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली. मागण्या मान्य न केल्यास लवकरच मोठे आंदोलन उभे करून बाजारपेठ बंद ठेवू, असा इशारा या वेळी देण्यात आला.

ज्ञानेश्वर मामडे, हर्ष मालू, शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले, गोदा फार्मचे नितीन चव्हाण, आनंद मंत्री, संदीप बाहेती, स्वप्नील मुरक्या, जुगल बाहेती, श्याम मुरक्या, मनोज लड्डा, सुनील लड्डा, जयप्रकाश लड्गो, गोपाल धूत, प्रवीण कासलीवाल, प्रल्हाद काकांडीकर, बालाजी लड्डा, अक्षय गोयंका, सत्तू भराडिया, आशिष रांका, सुनील काबरा, संजय बाहेती, आलोक जाधव, आनंद धूत, दीपक म्होरक्या, रवी नागठाणे, राहुल नागठाणे उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com