Vegetable Market : संक्रांतीमुळे कोल्हापुरात फळभाज्यांना मागणी

दरात सुधारणा झालेल्या भाजीपाल्यामध्ये वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, ओला वाटाणा व गवारीचा समावेश होता.
Market vegetable
Market vegetableAgrowon

कोल्हापूर : येथील बाजार समितीत (Kolhapur APMC) या सप्तहात वांगी, ओली मिरची व गवारीच्या दरात (Vegetable Rate) तेजी राहिली. भोगी व संक्रातीच्या (Makar Sankranti) पार्श्‍वभूमीवर गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत या सप्ताहात बहुतांश भाजीपाल्याच्या दरात (Vegetable Market) तेजी राहिली.

Market vegetable
Vegetable Crop : थंडी, ढगाळ वातावरण भाजीपाला पिकासाठी हानीकारक

दरात सुधारणा झालेल्या भाजीपाल्यामध्ये वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, ओला वाटाणा व गवारीचा समावेश होता. वांग्यास दहा किलोस १०० ते ७०० रुपयांपर्यंत दर होता. वांग्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने वांग्यात चांगली मागणी राहिली.

Market vegetable
Vegetable Market :‘देशी पावट्या’ने तोडला दराचा विक्रम

वांग्याची केवळ ८० ते १०० बॉक्स इतकीच आवक राहिली. गवारीस दहा किलोस ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. कारली, भेंडी, वरणा (पावटा), दोडका या भाज्यांना दहा किलोस १०० ते ४०० रुपयापर्यंत दर होता. संक्रातीच्या पार्श्‍वभूमीवर गाजराच्या दरातही सुधारणा होती. गाजरास दहा किलोस २०० ते ४५० रुपये दर मिळाला.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ७०० रुपये दर होता. कोथिंबिरीची २५ ते ३० हजार पेंढ्या या सप्ताहात आवक झाली. कांदापात, मेथी, पालक, शेपू या भाज्यांना सरासरी शेकडा ५०० ते ७०० रुपये दर मिळाला. मेथीची सहा ते सात हजार पेंड्यांची आवक होती. भाजीपाल्यांची आवक १००० ते २००० पेंड्याच राहिली.

फळांमध्ये द्राक्षाची आवक सुरू झाली आहे. सांगली, सोलापूर भागांतून द्राक्ष बाजार समितीत येत आहेत. द्राक्षास प्रति बॉक्स १५० ते ३५० रुपये इतका दर मिळाला. रोज ५० ते १०० बॉक्स इतकी आवक झाली. बोरास किलोस १० ते ३० रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com