Soybean Rate : सोयाबीनमध्ये मंदी ही अफवा आहे का?

यंदा देशातील सोयाबीनचा पेरा काहीसा कमी होऊनसुध्दा दर मात्र नरमले आहेत. मागील दोन महिन्यांत सोयाबीन जवळपास ३० टक्क्यांनी घसरलंय. त्याला काही घटक कारणीभूत आहेत.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

पुणेः सोयाबीनचा नवा हंगाम अगदी तोंडावर आला आहे. तसं नेहमीप्रमाणं बाजारात सोयाबीनला यंदा रेट (Soybean Rate) काय मिळणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सोयाबीन पिकाची स्थिती (Soybean Crop Condition) चांगली असून उत्पादकताही (Soybean Productivity) चांगली राहील, असा अंदाज उद्योगातून व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीन, कापसावर मंदीचे ढग?

यंदा देशातील सोयाबीनचा पेरा (Soybean Sowing) काहीसा कमी होऊनसुध्दा दर मात्र नरमले आहेत. मागील दोन महिन्यांत सोयाबीन जवळपास ३० टक्क्यांनी घसरलंय. त्याला काही घटक कारणीभूत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरातील तेजी जवळपास विरलीय. पामतेलाचे दर एप्रिल महिन्यात ७ हजार ८०० रुपये प्रतिटन होते. ते आता ३ हजार ४०० रुपयांपर्यंत घसरलेत. सोयाबीन तेलाचेही दर कमी झालेत. निर्यात पडतळ नसल्यानं सोयापेंड निर्यातही कमी राहिली. त्यामुळं सोयाबीनचा साठा वाढत जावून दर दबावात येत गेले.

Soybean Rate
Soybean Rate : कापूस, सोयाबीनच्या दरात उतरता कल

खाद्यतेलाचे दर तेजीत होते त्यामुळं सोयाबीनचं गाळप झालं. मात्र सोयापेंड निर्यात कमी झाल्यानं मिल्सकडे साठा आहे. तर दर वाढण्याच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनीही सोयाबीन साठवून ठेवलंय. तसंच खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानं नंतरच्या टप्प्यात गाळपही मंदावलं. गाळप कमी झाल्यानं देशात २० लाख टनांच्या दरम्यान शिल्लक सोयाबीन असल्याचा अंदाज उद्योगातून व्यक्त होतोय. मात्र हा आकडा अवास्तव असून १० टक्क्यांच्या दरम्यान म्हणजेच १० ते १२ लाख टन सोयाबीनचा साठा असू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारनं यंदा २० लाख टन सोयातेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिलीय. या सवलतीअंतर्गत सोयातेल आयात सुरु आहे. त्याचा दबाव सोयाबीन दरावर आलाय.

आता काही ठिकाणी नवं सोयाबीन बाजारात येतंय. सध्या सोयाबीन पिकाची स्थिती चांगली असून उत्पादकताही जास्त राहील, असा अंदाज सोयाबीन प्रक्रिया उद्योगाने व्यक्त केलाय. मात्र जाणकारांच्या मते सोयाबीन उत्पादनाबाबत ठोसपणे ऑक्टोबर महिन्यात सांगता येईल. ला निना स्थितीमुळं ऑक्टोबरमध्ये यंदा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळं देशात यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या पुरवठ्याची स्थिती काय राहिल, याचं चित्र ऑक्टोबरमध्येच स्पष्ट होईल, असं जाणकारांचं मत आहे.

सध्या काही बाजारांमध्ये नव्या सोयाबीनची आवक होतेय. मात्र या मालात ओलावा अधिक आहे. तर बाजारावर काही घटकांचा दबाव आणि उद्योगांकडून शिल्लक साठा आणि उत्पादनाबाबतच्या पेरल्या जाणाऱ्या बातम्या यामुळं सोयाबीनला सध्या सरासरी ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी हा किमान दर लक्षात घेऊन विक्रीचं नियोजन करावं. तर ऑक्टोबरमध्ये उत्पादनाविषयीचे आकडे स्पष्ट झाल्यानंतर जाणकारांचा अंदाज लक्षात घेऊन विक्री करावी. सध्या बाजारात सोयबीन पीक आणि उत्पादनाचे विविध तर्क लावले जात आहेत. तसंच काही अफवाही आहेत. याला शेतकऱ्यांनी बळी न पडता बाजारातील किंमतपातळीवर नजर ठेऊन विक्रीचा निर्णय घ्यावा, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

खाद्यतेलाचे कमी झालेले दर, सोयापेंड निर्यातीत घट, सोयातेल आयातीत वाढ या घटकांचा बाजारावर सध्या दबाव आहे. असं असलं तरी मागणी-पुरवठ्याचं गणित बघता सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो. मात्र जास्तीत जास्त दर किती राहू शकतो हे ऑक्टोबरमध्ये उत्पादनाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच सांगता येईल.
राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com