Vegetable Market :‘देशी पावट्या’ने तोडला दराचा विक्रम

भोगी-संक्रांती दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण करून भाजी बनवण्याची पद्धत पूर्वापार आहे. यासाठी भाज्यांची मोठी गरज असते.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon

कोल्हापूर : भोगी-संक्रातीच्या (Bhigi Sankranti) पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील देशी वरण्याला (पावटा) (Desi Beans) विक्रमी २०० रुपये किलोपर्यंत भाव (Beans Rate) मिळाला. गेल्या काही दिवसांपासून मंदीच्या तडाख्यात असणाऱ्या भाजीपाल्याला एक दिवसापुरती तरी तेजीची गोडी चाखता आली.

भोगी-संक्रांती दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण करून भाजी बनवण्याची पद्धत पूर्वापार आहे. यासाठी भाज्यांची मोठी गरज असते. हिवाळ्यात येणाऱ्या भाज्यांबरोबरच अन्य भाजीपाल्यांनाही मकर संक्रांतीच्या दरम्यान मागणी असते.

Vegetable Market
Vegetable Market : भाजीपाल्यांचे नियमित उत्पन्न ठरतेय लाभदायक

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे प्रसिद्ध असणाऱ्या वरण्याला मात्र यंदा भोगीने चांगलाच हात दिल्याचे चित्र होते. संकरित वाणांच्या वरण्याला १०० रुपये किलोपर्यंत दर होता. तर देशी वरण्याला दोनशे रुपये किलोपर्यंत दर मिळाला.

पश्‍चिम भागातील बहुतांशी बाजारपेठांमध्ये वरण्याच्या दरात तेजी कायम होती. यामुळे या बाजारामध्ये नेहमीच ग्राहकांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्याला यंदा ग्राहकच शोधत असल्याचे चित्र दिसले.

अपुरा माल व दरात वाढ असल्याने साहजिकच वरण्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. विशेष करून बांधावरचा वरणा अशीच या पिकाची या भागात खासियत आहे.

रब्बी पिकांच्या भोवताली बांधावर वरण्याचे पीक बहुतांश करून घेतले जाते. पश्‍चिम भागात कमी क्षेत्रामुळे बांध जास्त असल्याने करण्याचे पीक हमखास आढळते.

गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात घसरण अनुभवयास मिळत आहे. अनेक फळभाज्यांनाही कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची उद्विग्नता वाढली आहे.

या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारचा (ता. १३) दिवस भाजीपाल्यांची ‘ऐट’ वाढवणारा ठरला. मागणीत मोठी वाढ झाल्याने बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात दुपटीने सुधारणा झाली.

वरणा विक्रीचा आनंददायी अनुभव

केखले (ता. पन्हाळा) येथील जयवंत मगदूम यांच्यासाठी शुक्रवारचा (ता. १३) दिवस खूपच आनंदाचा ठरला. त्यांच्याकडे तीन गुंठे क्षेत्रावर देशी वरण्याचे पीक आहे. हा वरणा ते कोडोली येथे विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात. साधारणतः ४० रुपये ते ५० रुपये किलो म्हणजे वरण्याचा उच्चांकी भाव समजला जातो.

Vegetable Market
Vegetable Crop : थंडी, ढगाळ वातावरण भाजीपाला पिकासाठी हानीकारक

पण शुक्रवारी मगदूम यांच्याकडे देशी वाणाचा वरणा असल्याने याचा सुवास सगळीकडेच होता. यामुळे ग्राहकांनी हा वरणा जादा दर घेऊनही घेतला. ५० रुपयांपर्यंत कसे तरी जाणारा भाव २०० रुपयांपर्यंत गेला.

देशी वाण असल्याने ग्राहकांनी प्रामुख्याने या वरण्याची निवड केल्याचे मगदूम यांनी सांगितले. दुपारी बारा ते रात्री तब्बल नऊ वाजेपर्यंत मगदूम वरण्याची विक्री करत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com