Onion Rate : कांदा दर वाढूनही शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मागील दोन हंगामात पुरते तोट्यात गेले. कांद्याला बाजारात उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळाला. लेट खरिप आणि उन्हाळ कांदा एकाच वेळी बाजारात दाखल झाला आणि कांदा दर दबावात आले.
Onion Rate
Onion Rate Agrowon

पुणेः शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा ठरलेला कांदा (Onion) आता काहीसा आधार देताना दिसत आहे. कांद्याच्या सरासरी दराने (Onion Rate) २ हजार ४०० रुपयांचा टप्पा गाठला. मात्र यातूनही शेतकऱ्यांचे नुकसान (Farmer's Loss) भरून निघणारे नाही. कारण शेतकऱ्यांना बहुतांशी कांदा १ हजार ५०० रुपयांपेक्षाही कमी दरात विकावा लागला.

Onion Rate
Onion Rate : कांदा, लसूण उत्पादक तोट्यात

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मागील दोन हंगामात पुरते तोट्यात गेले. कांद्याला बाजारात उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळाला. लेट खरिप आणि उन्हाळ कांदा एकाच वेळी बाजारात दाखल झाला आणि कांदा दर दबावात आले. त्यानंतर पाऊस आणि उष्णतेने शेतकऱ्यांचे गणितच बिघडवले. उष्णतेमुळे कांद्याची टिकवण क्षमता कमी झाली. त्यामुळे कांद्याची सड वाढली. कांदा जास्त खराब होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी कांदा मिळेल त्या दरात विकला.

Onion Rate
Onion Rate : उमराणेत लिलावात खरीप कांद्याला मुहूर्ताचा दर ११,१११

सध्या टिकवणक्षमता चांगली असलेला कांदा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे बाजारातील आवकही कमी झाली. शेतकऱ्यांकडे सध्या कांदा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र जास्तीत जास्त कांदा कमी दरात विकावा लागल्याने हे शेतकरी टप्प्याटप्याने बाजारात माल आणताना दिसत आहे. त्याचेही प्रमाण कमी आहे. बाजारातील आवक कमी असल्याने कांदा दरात सध्या सुधारणा दिसत आहे.

तसेच लाल कांद्याच्या लागवडीही पावसाने खराब केल्या. रोपवाटिकांचे नुकसान झाले. सततच्या पावसाने लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे लाल कांद्याचे उत्पादन घटण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. परिणामी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

परिणामी कांदा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. कांद्याला बाजारात सध्या किमान १ हजार ७०० रुपयांपासून दर मिळत आहे. तर कमाल दर २ हजार ५०० रुपयांवर पोचला. तर सरासरी दराने २ हजार ४०० रुपयांचा टप्पा गाठला. बाजारातील मागणी पुरवठ्याचं गणित पाहता कांदा दर तजीतच राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com