Cotton Rate : भाव वाढूनही कापसाची आवक कमीच

देशातील बाजारात कापसाच्या दरात आजही क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. कापसाचा सरासरी भाव आता ८ हजार ५०० रुपयांच्याही पुढे गेला. मात्र शेतकऱ्यांनीही अद्यापही कापसाची विक्री वाढवली नाही.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

पुणेः देशातील बाजारात कापसाच्या दरात (Cotton Rate) आजही क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. कापसाचा सरासरी भाव (Cotton Market Rate) आता ८ हजार ५०० रुपयांच्याही पुढे गेला. मात्र शेतकऱ्यांनीही अद्यापही कापसाची विक्री (Cotton Sale) वाढवली नाही.

Cotton Rate
Soybean Cotton : शेतकऱ्यांना भीक नको, घामाचे दाम द्या

देशातील कापसाचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु झाला. मात्र दर दबावात आले होते. परंतु दिवाळीनंतर देशात उद्योगाकडून कापसाला मागणी वाढली. मात्र दर दबावात असल्यानं फक्त पैशांची निकड असलेले शेतकरीच कापसाची विक्री करत होते. इतर शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला होता. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरात सुधारणा झाली. त्याचा परिणाम देशातील कापूस बाजारावर झाला.

Cotton Rate
Cotton Rate : कापूस वेचणी दरात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी वाढ

सुताला उठाव मिळाल्यानं कापसाला मागणी वाढली आहे. मागील पाच दिवसांपासून कापसाच्या दरात जवळपास ५०० ते ६०० रुपयांची सुधारणा झाली. त्यामुळे ६ हजार रुपयांवर गेलेले किमान दर आज पुन्हा ७ हजारांवर आले. तर ८ हजार रुपयांपर्यंत गेलेले कमाल दर आज काही ठिकाणी ९ हजार रुपयांवर पोचले.

आजही कापसाच्या दरात २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. आज महाराष्ट्रात कापसाला ८ हजार ते ९ हजार ४०० रुपये दर मिळला. तर सरासरी दर ८ हजार ६०० रुपयांवर होता. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील दरानेही ९ हजार ते ९ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला. इतर राज्यांमध्येही कापसाचा सरासरी भाव ८ हजार ते ८ हजार ७०० रुपयांच्या पुढे गेला आहे.

सरकीचे ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. सरकीच्या दरात आजही ५० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. आज मध्य प्रदेशात सरकीला प्रतिक्विंटल ३ हजार ६०० ते ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर महाराष्ट्रातील दर ३ हजार ७०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होता. गुजरातमध्ये ३ हजार ८०० ते ४०५० रुपयाने सरकाचे व्यवहार झाले.

देशात सुतगिरण्या कापसाची खरेदी करत आहेत. त्यातच खाद्यतेल आणि सोयापेंडचा आधार सरकीला मिळत आहे. त्यामुळे कापूस दर सुधारले आहेत. सध्या कापसाचे दर सुधारत असले तरी शेतकऱ्यांनी कापूस विक्री वाढवली नाही. त्यामुळे दरात आणखी काही सुधारणा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांना यंदा कापसासाठी सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं विक्री सुरु ठेवावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com