Soybean Verity : ताण सहन करणारी सोयाबीन जात विकसित

मध्य प्रदेश सरकारने या नवीन जातीला मान्यता दिली असून पुढील खरीप हंगामापासून लागवड सुरू होईल. दहा वर्षांच्या संशोधनानंतर एनआरसी-१३६ ही जात विकसित करण्यात आली आहे.
Soybean Crop
Soybean CropAgrowon

नागपूर : इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने (आयआयएसआर) (Indian Soybean Research Center) बदलत्या वातावरणात तग धरणारी आणि पाण्याचा ताण सहन करणारी सोयाबीनची एनआरसी १३६ ही जात (Soybean Verity) विकसित केली आहे. मध्य प्रदेशात या जातीच्या प्रसाराला मान्यता मिळाली आहे. तसेच पूर्व विभागातील काही राज्यांमध्ये येत्या खरीप हंगामात या जातीची लागवड (Soybean Cultivation) होईल, अशी माहिती भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. नीता खांडेकर यांनी दिली.

Soybean Crop
Soybean Rate : सोयाबीन बाजार कसा राहील?

मध्य प्रदेश सरकारने या नवीन जातीला मान्यता दिली असून पुढील खरीप हंगामापासून लागवड सुरू होईल. दहा वर्षांच्या संशोधनानंतर एनआरसी-१३६ ही जात विकसित करण्यात आली आहे. मॉन्सूनच्या कालावधीत दीर्घकाळ खंडामध्ये ही जात तग धरते. मध्य प्रदेशात या जातीच्या प्रसारणास मान्यता मिळाली आहे.

Soybean Crop
Soybean : कणेरी कृषी विज्ञान केंद्रातर्फे १२५ एकरांवर सोयाबीन प्रात्यक्षिके

बिहार सरकारने पुढील हंगामासाठी या जातीचे बियाणे उपलब्ध होण्यासाठी मागणी नोंदविली आहे. महाराष्ट्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये या जातीची चाचणी घेण्यात येत आहे. चाचण्यांचे हे दुसरे वर्ष असून, तीन वर्षांच्या निष्कर्षानंतर महाराष्ट्रात या जातीच्या प्रसारणास मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेशकुमार सातपुते यांनी दिली.

जातीची वैशिष्ट्ये...

- दाणे भरण्याच्या काळात पावसाचा २० ते २५ दिवसांचा खंड पडला तरी समाधानकारक वाढ.

- १०२ दिवसांत तयार होते.

- मूगबीन यलो मोझॅक रोग, पाने खाणाऱ्या अळीस मध्यमस्तरीय प्रतिकारक.

- प्रति हेक्टरी १७ क्विंटल उत्पादन.

- ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड राज्यांत पेरणीसाठी प्रसारित.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com