Cotton Rate : कापूस दरामुळे पाकिस्तानची गोची?

शेजारच्या पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे येथील उद्योगाला यंदा कापूस आयात वाढवावी लागणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सुरु असलेल्या चढ उतारामुळे पाकिस्तानला कापूस खरेदीत अडचणी येत आहेत.
Cotton
CottonAgrowon

पुणेः शेजारच्या पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादन (Cotton Production) मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे येथील उद्योगाला यंदा कापूस आयात (Cotton Arrival) वाढवावी लागणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात (International Cotton Market) सध्या सुरु असलेल्या चढ उतारामुळे पाकिस्तानला कापूस खरेदीत अडचणी येत आहेत. पाकिस्तान यंदा ७० लाख गाठी कापूस आयात करण्याची शक्यता आहे.

Cotton
Cotton Bollworm : बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा

यंदा पाकिस्तानमधील कापूस पिकाला पुराचा मोठा फटका बसला. त्यामुळे यंदा पाकिस्तानमधील कापूस उत्पादन २९ लाख गाठींनी घटण्याचा अंदाज आहे. तर येथील उद्योगाच्या मते उत्पादन ४८ लाख गाठींवर स्थिरावेल. पाकिस्तानमधील कापूस उत्पादन कमी झाल्याने आयात वाढविण्याशिवाय पर्याय नाही. तसेही सामान्य उत्पादन झालेल्या स्थितीतही पाकिस्तानला आयात करावी लागते. मात्र यंदा पाकिस्तानची कापूस आयात ७० लाख गाठींवर पोचण्याचा अंदाज आहे.

Cotton
Cotton Rate : कापसाचे पुढचे वायदे का नाही आले?

पाकिस्तानमधील कापूस उत्पादनाची स्थिती लक्षात घेऊन येथील उद्योगांनी जवळपास ५० लाख गाठी कापूस खरेदीचे करार केले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढलेले आहेत. याचा फटका पाकिस्तानी उद्योगाला बसत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दर काहीसे टिकून आहेत. त्यातच डाॅलरचे मूल्य वाढल्यानेही आय़ातीत अडचणी येत आहे. त्यामुळे खरेदीदार स्थानिक कापसालाच जास्त पसंती देत आहेत, असे येथील उद्योगांनी स्पष्ट केले.

येथील कापड उद्योगाला मागील हंगामात कापसाची टंचाई जाणवत होती. तेव्हापासून आजपर्यंत काही कापड गिरण्या निम्म्या क्षमतेनेच सुरु आहेत. पाकिस्तानमधील सूतगिरण्या आणि कापड उद्योगाकडे आधीचा साठा पडून आहे आणि जिनिंगकडेही चांगल्या प्रतीचा जास्त दराने खरेदी केलेले कापूस पडून आहे. त्यामुळे कापसाची मुल्यसाखळी आर्थिक अडचणीत आली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. त्यामुळेही येथील उद्योगापुढे समस्या निर्माण झाल्या आहेत.

कापूस दर

पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात मोठी घट झाल्याने दर तेजीत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये रुईला प्रतिक्विंटल ३६ हजार २५० ते ४२ हजार ५०० पाकिस्तान रुपये दर मिळत आहे. तर कापसाची सरासरी १२ हजार ५०० २० हजार पाकिस्तानी रुपये प्रतिक्विंटलने खरेदी केली जात आहे. कापसाबरोबरच सरकीपेंडही तेजीत आहे.

बाजारातील आवक

पाकिस्तानधील शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४२ लाख गाठी कापसाची विक्री केली आहे. येथील जिनिंग उद्योगाच्या मते १ डिसेंबरपर्यंत ४२ लाख ८० हजार गाठी कापूस प्रक्रियेसाठी आला आहे. मागीलवर्षी याच काळात प्रक्रिया झालेल्या कापसाच्या तुलनेत यंदा ४० टक्क्यांनी प्रमाण कमी आहे, असे पाकिस्तानमधील जिनिंग उद्योगाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com