Onion Rate : उन्हाळ कांद्याच्या दराची कोंडी कायम

चालूवर्षी वातावरणीय बदल, वाढलेला उत्पादन खर्च, मजुरांचा तुटवडा अशी अनेक आव्हाने असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले. मात्र काढणीवेळी उत्पादनात मोठी घट होण्यासह प्रतवारीचा प्रश्न होता.
Onion Rate
Onion RateAgrowon

नाशिक ः चालूवर्षी वातावरणीय बदल (Climate Change), वाढलेला उत्पादन खर्च, मजुरांचा तुटवडा अशी अनेक आव्हाने असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmer) उत्पादन घेतले. मात्र काढणीवेळी उत्पादनात मोठी घट होण्यासह प्रतवारीचा प्रश्न होता. असे असताना शेतकऱ्यांनी कांदा साठविण्यावर (Onion Storage) भर दिला. त्यामुळे दराची अपेक्षा लागून होती. एप्रिल ते डिसेंबरअखेर कांद्याला अपेक्षित दर (Onion Rate) मिळाला नाही. उन्हाळ कांद्याच्या सांगतेपर्यंत दराची कोंडी कायम राहिली. उत्पादन खर्चाच्या खाली दर राहिल्याने यंदाचे वर्ष अडचणीचे ठरले आहे.

नाशिक जिल्ह्यात प्रमुख लासलगाव बाजार समितीत एप्रिल महिन्यात नवीन माल निघाल्यानंतर उन्हाळ कांद्याला सरासरी ९७८ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सुरुवातीलाच उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत असल्याची स्थिती होती. मे महिन्यात त्यात घसरण होऊन ८३९ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

Onion Rate
Onion Market : सोलापुरात कांदा लिलाव सुमारे दोन तास रखडले

जून महिन्यापासून सुधारणा दिसून आली. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात दरात घसरण झाली. त्यांनतर सप्टेंबर महिन्यात काहीशी आवक कमी झाल्याने दरात सुधारणा होऊन प्रतिक्विंटल १,३९२ रुपये दर मिळाला. पुढील टप्प्यात साठा संपुष्टात येत असताना दरात सुधारणा होऊन ऑक्टोबर महिन्यात १,८८२ रुपये तर नोव्हेंबर महिन्यात १,९१४ रुपये दर मिळाला. मात्र अंतिम टप्प्यात पुन्हा दरात घसरण झाली आहे.

सप्टेंबर महिन्यानंतर आवक कमी होत असल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात उन्हाळा कांद्याला दराचा दिलासा मिळाला. मात्र नंतर पुन्हा खरीप लाल कांद्याची आवक हळूहळू सुरू झाल्यानंतर उन्हाळ कांद्याची मागणी कमी झाल्याने दराला फटका बसला.

Onion Rate
Onion Market : कांद्याचे बाजारभाव दबावातच

महाराष्ट्रात नाशिक भागातून खरीप लाल कांद्याची आवक वाढत आहे. त्यामुळे नवीन कांद्याला तुलनेत क्विंटलला ६०० ते ७०० रुपये अधिक दर मिळत आहे. यासह मध्यप्रदेशमधील खंडवा भाग, गुजरात राज्यातील महुवा गोंडल भाग, राजस्थान राज्यातील अल्वर तसेच कर्नाटक, तेलंगणा भागातून काही प्रमाणात आवक सुरू असल्याने उन्हाळ कांद्याला मागणी कमी आहे.

दरावर परिणाम करणारे मुद्दे :

- उन्हाळ लागवडी अधिक; वर्षभर टप्प्याटप्याने आवक कायम

- उत्पादन घटले; मात्र बाजारात आवक झाल्यानंतर खरेदीपश्चात अडचणी

- निर्यात मूल्यवाढ व वाहतूक भाडे खर्च वाढल्याने निर्यातीत घट

- अस्थिर कांदा निर्यात धोरणामुळे आयातदार देशांची मागणी कमी

- प्रमुख आयातदार बांगलादेश, श्रीलंका येथे निर्यातीचा टक्का घटला

चालू वर्षातील कांद्याची प्रमुख बाजारातील दर स्थिती:

बाजार समिती...एप्रिल...मे...जून...जुलै... ऑगस्ट...सप्टेंबर...ऑक्टोबर...नोव्हेंबर

लासलगाव...९७८...७७१...८३९...१,२२९...१,१७९...१,११९...१,३९२...१,८८२...१,९१४

पिंपळगाव बसवंत...९०५...८८१...१,२८०...१,२९०...१,१८५...१,२००...१,९५५...१,८५०

येवला...८२५...७००...१,०००...१,०००...१,०००...८५०...१,५५०...१,३००

चांदवड...७६३...७०६...९३२...९५२...९६०...९१३...१,४७९...१,४०९

आवक होत असलेल्या कांद्याची प्रतवारी पूर्वीसारखी नाही. गुणवत्तेचा माल कमी तर दुय्यम प्रतवारी माल अधिक येत असल्याने दराला फटका बसत आहे. सध्या दक्षिण भारतात कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश व तमिळनाडू येथे उन्हाळ कांद्याला मागणी आहे. त्यामुळे पुरवठा होत आहे. परिणामी दर टिकून आहेत.

- मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव, जि. नाशिक.

कांद्याचे प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन घेऊनही अपेक्षित परतावा

मिळालेला नाही. टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करत गेल्याने उत्पादन खर्च काढण्यास मदत झाली. यंदा दराने साथ दिलेली नाही.

- पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com