Cotton Arrival : भाववाढीच्या आशेने कापूस आवक मंदावली

गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर आठ हजार दोनशेच्या पुढे सरकलेले नाहीत. दर वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबविली आहे.
Cotton Arrival | Cotton Rate | Cotton Market Price
Cotton Arrival | Cotton Rate | Cotton Market Price Agrowon

यवतमाळ : गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर (Cotton Rate) आठ हजार दोनशेच्या पुढे सरकलेले नाहीत. दर वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री (Cotton Sale) थांबविली आहे. कापसाचे दर दहा हजारांवर जातील, अशी अपेक्षा कापूस उत्पादकांना आहे. परिणामी कापसाची आवक (Cotton Arrival) मंदावली असून, शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

Cotton Arrival | Cotton Rate | Cotton Market Price
Cotton Rate : कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत

ग्रामीण भागात यावर्षी कापसाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. कापसाचे वाढलेले दर खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली तेजी पाहता कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबविली आहे. कापसाची वेचणी करून साठवणूक केली जात आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे व रासायनिक खतांच्या तुटवडा या अडचणींचा सामना करीत कापूस लागवड झाली होती.

Cotton Arrival | Cotton Rate | Cotton Market Price
Cotton Rate : कापूस दर कितीने नरमले?

कापसाचे पीक जोमात असताना पावसाने हजेरी लावल्याने पिकाला फटका बसला होता. त्यामुळे कापसाचे उत्पादन निम्म्याने घटले असून, शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या शेतामध्ये असलेल्या कापसाच्या वेचणीची कामे सुरू आहेत; मात्र, दर घसरल्याने बाजारात विक्रीला येणाऱ्या कापसाची आवक मंदावली आहे. कापसाचे दर नऊ हजार रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळे लवकरच कापूस दर दहा हजारी पार करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

काही दिवसांत वाढलेले दर आठ हजारांवर आले आहेत. दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कापसाची आवक मंदावली आहे. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

सध्या कापसाला आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपये दर आहेत. त्यामुळे शेतकरी कापूस विकण्याच्या मनस्थितीत नाहीत. बाजारपेठेत कापसाची आवक कमी झाली आहे. कापूस उत्पादनात झालेला तोटा भाव वाढल्यास भरून निघेल, या आशेवर शेतकरी आहे. कापसाचाही भाव नक्कीच वाढेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

‘सीसीआय’ने खासगी केंद्रे सुरू केली आहेत. जिल्ह्यात केंद्र नसले तरी ते सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या कापसाला दर नाहीत. काही दिवस प्रतीक्षा करून दर वाढीनंतरच कापूस विकावा, अशी आमची मानसिकता आहे. खरीप हंगाम संपला असून, रब्बी हंगाम अर्धा झाला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस शेतकऱ्यांच्या हातात आहेत.

- पुंडलिक गावंडे, शेतकरी, बोदेगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com