Cashew Season : काजू हंगामाचा शेवटही ‘कडू’च

Cashew Market Rate : या वर्षीच्या काजू हंगामाच्या सुरुवातीप्रमाणे हंगामाचा शेवटदेखील कडूच झाला आहे. अंतिम टप्प्यातील काजू बी व्यापाऱ्यांकडून प्रतिकिलो केवळ ९५ रुपयांनी खरेदी केली जात आहे.
Cashew Processing
Cashew Processing Agrowon

Cashew Market Update : या वर्षीच्या काजू हंगामाच्या सुरुवातीप्रमाणे हंगामाचा शेवटदेखील कडूच झाला आहे. अंतिम टप्प्यातील काजू बी व्यापाऱ्यांकडून प्रतिकिलो केवळ ९५ रुपयांनी खरेदी केली जात आहे. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

जिल्ह्यात यावर्षी काजू हंगाम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला. सुरुवातीला ११० ते ११५ रुपयांनी काजू बीची खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली. उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने काजू बी खरेदी केली जात होती. परंतु हंगाम सुरू झाल्यानंतर महिनाभरात काजू बी ची अपेक्षित आवक बाजारपेठेत झालेली नाही.

Cashew Processing
Cashew Processing : आधुनिक तंत्राच्या सहाय्याने तरूणाची काजू प्रक्रिया उद्योगात भरारी

त्यामुळे व्यापारी आणि कारखानदारांनी काजू बीच्या दरात किंचित वाढ केली. काजू बी प्रतिकिलो १२० ते १३० रुपयांनी खरेदी करण्यास सुरुवात केली. मात्र मार्चनंतर मोठ्या प्रमाणात काजू बी बाजारात उपलब्ध होऊ लागली.

Cashew Processing
Cashew Crop : काजू विकासासाठी ५३ कोटींचा आराखडा

आठवडा बाजारांमध्ये शेकडो टन काजू बीची आवक झाल्याने व्यापाऱ्यांनी काजू बीचे दर पुन्हा कमी करण्यास सुरुवात केली. दर आठवड्यातला पाच ते दहा रुपयांनी दरात घसरण करीत काजू बीचा दर १०५ ते ११० रुपयांवर स्थिर केला.

दहा-बारा दिवसांपूर्वी त्याच दराने काजू बीची खरेदी केली जात होती. परंतु आता त्यामध्येदेखील घसरण झाली आहे. सध्या व्यापारी अवघ्या ९५ रुपये दराने काजू बीची खरेदी करीत आहेत. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com