Vegetable Market : नुकसानीमुळे भाजीपाला आवक घटली

शेवग्याची आवक मंदावल्याने दरांत वाढ; आवळ्याचा हंगाम सुरू
Vegetable  Market
Vegetable MarketAgrowon

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Pune APMC) रविवारी (ता.११) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ८० ट्रक भाजीपाल्याची आवक (Vegetable Arrival) झाली होती. राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या अवकाळी सदृश पावसामुळे अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान (Vegetable Damage Due To Rain) झाले आहे. परिणामी आवक घटली असून, आवक आणि मागणी संतुलित असल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर (Vegetable Rate) स्थिर होते. तर शेवग्याची आवक मंदावल्याने दरांत वाढ झाली असून, आवळ्याचा हंगाम सुरू झाल्याने आवक सुरू झाली आहे.

परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे ५ टेम्पो, कर्नाटक येऊन ३ टेम्पो घेवडा आणि भुईमूग २ टेम्पो, गुजरात येथून ३ ट्रक कोबी आणि इंदूर येथून गाजर ८ टेम्पो आवक झाली होती.

तर राज्याच्या विविध भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० पोती, टॉमेटो सुमारे ८ हजार क्रेट, फ्लॅावर १० तर कोबी सुमारे ५ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे ५० पोती, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, तांबडा भोपळा टेम्पो १०, मटार सुमारे ४०० गोणी आवक झाली होती. तर कांदा ५० तर बटाटा सुमारे ४० ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची १० ट्रक आवक झाली होती.

Vegetable  Market
Vegetable Rate : कळमना बाजारात पालेभाज्यांच्या दरात तेजी

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : १२०-१६०, बटाटा : १७०-२२०, लसूण : १००-४००, आले सातारी : १००-४००, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : १००-२००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी ३००-३५० पांढरी - २००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २५०-२८०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : १००-१६०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ३५०-४००, बीट : १८०-२००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग शेंग : ४५०-५००, मटार : ४००-७०० पावटा : ४००-४५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

Vegetable  Market
Vegetable : शेतकरी नियोजन पीक : कोबी

आवळ्याचा हंगाम सुरू

बाजारात आवळ्याचा हंगाम सुरू झाला असून, आवळा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यांमधून आवळ्याची आवक सुरू झाली आहे. रविवारी (ता.११) सुमारे दहा टन आवक झाली होती. यावेळी प्रति किलोला २० ते ३० रुपये दर होता. सध्या आवळ्याचा आकार कमी असून, हंगाम सुरळीत झाल्यावर आवळ्याचा आकार वाढेल, यानंतर दर ४० ते ५० रुपयांपर्यंत मिळेल असा अंदाज आवळा आडतदार पांडुरंग सुपेकर यांनी व्यक्त केला.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सव्वा लाख तर मेथीची ५० हजार जुड्या आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-२०००, मेथी : ५००-१२००, शेपू : ६००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ५००-७००, पुदीना : २००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-८००, चुका : ६००-१०००, चवळई : ४००-७००, पालक : ६००-१२००.

फळबाजार

फळ बाजारात रविवारी (ता.११) लिंबाची सुमारे दीड हजार गोणी आवक झाली होती. तर डाळिंब सुमारे ३५ टन, मोसंबी सुमारे ६० टन, संत्रा १५ टन, पपई २० टेम्पो, सीताफळ २० टन पेरू ७०० क्रेटस कलिंगड १० तर खरबूज प्रत्येकी ३ टेम्पो आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे

लिंबे (गोणीस) - ७००-१२००, डाळिंब (किलो) गणेश - ५-२५,

भगवा ३०-१५०, आरक्ता १०-६०, पपई प्रति किलो -५-३०, पेरू (२० किलो) -३००-५००, सीताफळ - १०-१२५, कलिंगड ५-१७ खरबूज १०-४०, मोसंबी ३ डझन १००-२२०, ४ डझन २०-१००. संत्रा (१० किलो) २००-६००.

फुलबाजार

पावसामुळे बाजारातील फुलांच्या आवकेमध्ये ओल्या फुलांचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत असल्याने सुक्या फुलांना चांगले दर मिळत आहे. यामुळे फुलांच्या दरांत वाढ झाली आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ३०-६०, अ‍ॅष्टर : जुडी १०-२०, सुट्टा १००-१२०, बिजली : ३०-४०, कापरी : १०-३०, शेवंती : ३०-५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ४०-८०, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ५०-१००, शेवंती काडी ८०-१५०, लिलियम (१० काड्या) १०००-१२००, ऑर्चिड ३००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ५०-१००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com