Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या अफवेचा चिकन, अंड्यांच्या दरावर परिणाम

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा होण्याला सुमारे सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. दरात काहीशी सुधारणा होत असतानाच पुन्हा ‘लम्पी स्कीन’बाबत अफवा सुरू झाल्याने दरावर परिणाम झाला.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

नगर ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Virus Outbreak) कमी झाल्यानंतर चिकन (Chiken Rate), अंड्यांच्या दरात (Egg Rate) सुधारणा होण्याला सुमारे सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. दरात काहीशी सुधारणा होत असतानाच पुन्हा ‘लम्पी स्कीन’बाबत अफवा (Lumpy Skin Disease Rumor) सुरू झाल्याने दरावर परिणाम झाला. ब्रॉयलरच्या दरात (Broiler Chicken Rate) साधारण प्रतिकिलो वीस रुपयांनी तर अंड्यांचे दर शेकड्याला पंचवीस रुपयांनी कमी झाले, असे पोल्ट्री उत्त्पादक (Poultry Farmer) शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान लम्पी स्कीन जनावरांचा त्वचा आजार आहे. त्याचा कुक्कुटपालनशी दूरचाही संबंध नाही. जाणीवपूर्वक अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ रोखण्यासाठी अकोल्यात खासगी पॅरावेटची मदत

राज्यात साधारण साठ ते सत्तर हजार कुक्कुटपालन करणारे शेतकरी आहेत. दर महिन्याला चार ते साडेचार लाख कोटी ब्रॉयलर कोंबड्यांचे म्हणजे नऊ ते सव्वानऊ कोटी चिकनचे उत्पादन होते. साधारण ८० हजार शेतकरी देशी, गावरान कोंबड्याचे उत्पादन घेतात. गावरान कोंबड्याचे पालन करणारे शेतकरी अधिक असले तरी उत्पादन संख्या मात्र कमी आहे. कोरोना काळातील अफवा व विक्रीची अडचण, त्यानंतर बर्ड फ्लूचे संकट, त्यातच खाद्याचे वाढते दर, त्यामुळे कुक्कुटउत्पादक अडचणीत होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पोल्ट्री उत्पादन बंद केले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर साधारण मार्च महिन्यात दरात सुधारणा होईल, असे वाटत होते; मात्र दरात फारसी सुधारणी झाली नाही. शिवाय खाद्यात सोयाचे दर काहीसे कमी झाले; मात्र मक्याचे दर वाढले. आता सहा महिन्यांनंतर गणेशोत्सव संपल्यावर चिकन, अंड्यांच्या दरात वाढ होऊ लागली होती.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : गोठ्यांना मरणकळा ‘लम्पी स्कीन’पुढे पशुपालक हतबल

अगदी ब्रॉयलर चिकन १४० रुपये प्रतिकिलो तर अंड्याला प्रती शेकडा ४२० ते ४३० रुपयांपर्यंत दर मिळत होता; मात्र चार-पाच दिवसांपासून ‘लम्पी’च्या अफवने दर खाली आले आहेत. आता चिकनला ११० ते ११५ रुपये प्रती किलो तर अंड्‍याला शेकड्याला ३८० ते ३९० रुपये मिळत असल्याचे विदर्भातील पोल्ट्री उत्पादक शिवराज मेतकर यांनी सांगितले. त्यामुळे पोल्ट्री उद्योजक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता दिसत असली तरी लम्पी स्कीन या जनावरांच्या त्वचा आजाराचा कुक्कुटपालनशी दूरचाही संबंध नाही. जाणीवपूर्वक अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

गावरानला मागणी चांगली

नगर जिल्ह्यातील देशी, गावरान कोंबडी उत्पादक व पोल्र्टी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष अंकुश कानडे यांनी सांगितले, की ‘लम्पी’बाबत अफवा असल्या तरी त्या आजाराचा कोंबड्याशी काहीही सबंध नाही, हे सातत्याने पशु आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. नगरसह राज्यात ब्रॉयलरसोबत गावरान कोंबड्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गावरानच्या विक्रीवर आणि दरावही काहीही परिणाम नाही. गावरान चिकनला १३५ ते १४० रुपये प्रती किलोला दर मिळत आहे. अंडेही प्रतिशेकडा साडेचारशे ते पाचशेपर्यंत जात आहे. मागणीही चांगली आहे. ब्रॉयलरशीही ‘लम्पी’चा काहीही सबंध नाही. ग्राहकांनी अशा अफवांना बळी पडू नये.

चिकनचा ‘लम्पी’शी संबंध नाही

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे म्हणाले, की जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचा कोंबड्यांशी संबंध जोडून काही ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत. लम्पी स्कीन हा केवळ गाय वर्गातील जनावरांना होणारा आजारा आहे. त्याचा शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांशी काहीही संबंध नाही. केवळ जाणीवपूर्वक त्याचा संबंध कोबड्यांशी जोडून अफवा पसरवत असतील तर अशांवर कारवाई केली जाईल. कुक्कुटउत्पादकांनीही घाबरण्याचे कारण नाही. चिकनशी, अंड्यांशी लम्पीचा दूरचाही संबंध नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com