Millet Market : धुळे बाजार समितीत परराज्यांतून बाजरी दाखल

निसर्गाच्या लहरीपणामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यात बाजरीचे उत्पादन घटल्याचे दिसते. यंदाही तसेच चित्र असले तरी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत परराज्यातूनही मोठ्या प्रमाणावर बाजरी विक्रीसाठी येत आहे.
Pearl Millet
Pearl MilletAgrowon

धुळे ः निसर्गाच्या लहरीपणामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यात बाजरीचे उत्पादन ( Pearl Millet Production) घटल्याचे दिसते. यंदाही तसेच चित्र असले तरी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dhule APMC) परराज्यातूनही मोठ्या प्रमाणावर बाजरी विक्रीसाठी येत आहे. रोज साधारण पाचशे ते हजार क्विंटल बाजरीची आवक आहे. हिवाळा सुरू झाल्याने ग्राहकांकडूनही बाजरीला चांगली मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Pearl Millet
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना अनुदानासाठी दावरवाडी फाट्यावर ‘रास्ता रोको’

यंदा अतिवृष्टीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे धान्यांचे उत्पादन घटले. बाजरीही काळी पडली. परिणामी या काळ्या बाजरीची विक्री होत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात पावसाळी बाजरीचे उत्पादन घटल्याने बाजार समितीतही स्थानिक शेतकऱ्यांकडील बाजरीची आवक कमी आहे.

मात्र बाजार समितीत सध्या राजस्थान, गुजरात, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून शेतकरी बाजरी विक्रीसाठी येत आहेत. हॉटेल व्यावसायिक, स्थानिक नागरिकांकडून बाजरीला सध्या चांगली मागणी आहे. ग्रामीण व गरीब कुटुंबांमध्ये बाजरी नियमित आहाराचा भागत आहे.

शहरी भागातील मध्यमवर्ग, नोकरदार वर्गात मात्र हद्दपार झाल्यागत स्थिती होती; मात्र, गेल्या काही वर्षांत आहाराबाबत अधिक जागरूकता निर्माण झाल्याने व बाजरीची उपयोगिता लक्षात आल्याने तसेच आहारतज्ज्ञ, डॉक्टरांकडूनही आता गव्हाबरोबरच बाजरी, दादर व इतर धान्याचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आता शहरी भागातही बाजरी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजरी खरेदीसाठी अनेक नागरिक बाजार समितीत जात असल्याचेही पाहायला मिळते.

Pearl Millet
Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

आवक वाढली

बाजरीचा भाव प्रतिकिलो ५ ते २० रुपयांवरून २४ ते २७ झाला. किरकोळ बाजारात हा भाव ३० ते ३५ रुपयांपर्यंत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, मध्य प्रदेशमधून रोज सुमारे पाचशे ते हजार क्विंटल बाजरीची आवक होत आहे. मंगळवारी (ता. २९) बाजार समितीत बाजरीला किमान २४०० ते कमाल २७०० रुपये क्लिंटल भाव मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com