Soybean : सोयाबीनची नक्की लागवड किती?

सरकारच्या मते २९ जुलैपर्यंत देशात जवळपास ११५ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली. मात्र सोपानं ११७ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाल्याचं म्हटलंय.
Soybean Sowing
Soybean Sowing Agrowon

पुणेः देशातील सोयाबीन लागवडीचा (Soybean Sowing) हंगामा आता शेवटच्या टप्प्यात आहे. सरकारच्या मते देशात आत्तापर्यंत ११५ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड (Soybean Cultivation) झाली. तर सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Soybean Processors Association Of India) अर्थात सोपाच्या मते लागवड यापेक्षा अधिक आहे.

२९ जुलैच्या पेरणी अहवालानुसार देशात मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा लागवड अडीच टक्क्यांनी अधिक आहे. मागील आठवड्यात मात्र १० टक्क्यांनी क्षेत्र अधिक होते. यंदा पावसामुळं पेरणीला उशीर होतोय. त्यामुळं सोयाबीन क्षेत्रवाढ कमी झाल्याचं जाणकारांचं म्हणणये.

Soybean Sowing
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

सरकारच्या मते २९ जुलैपर्यंत देशात जवळपास ११५ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली. मात्र सोपानं ११७ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाल्याचं म्हटलंय. सोपानं देशातील महत्वाच्या राज्यांतील पेरणीची आकडेवारी जाहीर केली. केंद्र सराकरनंं मध्य प्रेदशात आत्तापर्यंत ४८ लाख ७६ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाल्याचं सांगितलं. तर सोपाच्या म्हणण्यानुसार मध्य प्रेदशातील पेरणी ५० लाख २१ हजार हेक्टरवर झाली. मध्य प्रदेशात मागीलवर्षी जवळपास ५६ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली होती, असा अंदाज सरकार आणि सोपानं व्यक्त केला होता.

Soybean Sowing
Soybean : देशात सोयाबीन पेरणी घटली?

महाराष्ट्रातील लागवडीबाबतही सोपा आणि सरकारच्या आकडवारीत तफावत आहे. मागील हंगामात महाराष्ट्रात ४६ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता, असं सरकारनं सांगतिलं. मात्र सोपानं जवळपास ४४ लाख हेक्टरवरच महाराष्ट्रात सोयाबीन होतं, असं जाहीर केल. यंदा जवळपास ४७ लाख हेक्टरवर पेरा झाल्याचं सोपा म्हणतंय. तर सरकारच्या अहवालानुसार ४५.६ लाख हेक्टरवरच पेरणी झाली.

देशातील तिसरं महत्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य म्हणजे राजस्थान. मागील हंगामात राजस्थानमध्ये १०.६ लाख हेक्टरवर सोयाबीन होतं. पण यंदा येथे सोयाबीनचं क्षेत्र वाढलंय. सोपा आणि सरकारच्या मते राजस्थानमध्ये आत्तापर्यंत ११.२४ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली.

मागील हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळं यंदा लागवड १० टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज होता. मात्र सरकारच्यामते मागील हंगामाच्या तुलनेत लागवड केवळ अडीच टक्क्यांनी अधिक आहे. तर सोपाच्या मते सोयाबीन लागवड अधिक यापेक्षा अधिक आहे. तसंच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांत पावसाचा फटका बसतोय. दोन्ही राज्यांतील अनेक भागांत पिकामध्ये पाणी साचून नुकसान होत आहे. याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो, असा अंदाजही सोपाने व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com