Chana Procurement : ‘नाफेड’च्या हरभरा खरेदी नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ

नाफेड (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ)च्या हरभरा खरेदीसाठी वाढत्या प्रतिसादामुळे ऑनलाइन नोंदणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

Chana Market Update मुंबई : नाफेड (NAFED) (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ)च्या हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) वाढत्या प्रतिसादामुळे ऑनलाइन नोंदणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी २७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. १५ मार्चपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली होती.

Chana Rate
Chana Market : हरभरा-कापूस उत्पादकांसाठी विक्री अनुदान जाहीर करा

मात्र, यंदा आलेले विक्रमी उत्पादन आणि खुल्या बाजारात पडलेले दर यामुळे नाफेडच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी प्रयत्न केला होता.

Chana Rate
Chana Market : हरभऱ्याचे घाटेच भरले नाही; उत्पादकता घटल्याचा शेतकऱ्यांचा दावा

अनेक ठिकाणी नोंदणी होत नसल्याने गोंधळही झाला होता. शेतकऱ्यांची एनईएमएल पोर्टलवर होणारी दैनंदिन नोंदणी प्रक्रिया विचारात घेऊन ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कृषी विभागाच्या चौथ्या पाहणी अहवालानुसार राज्यात ३६.३९ लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यापैकी २५ टक्के हरभरा खरेदीस मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com