Paddy Procurement : धान, भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरअखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
Paddy Procurement
Paddy ProcurementAgrowon

नाशिक : खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत (MSP Procurement Scheme) धान व भरडधान्य खरेदीसाठी (Paddy Procurement) नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरअखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र शेतकरी नोंदणी पुरेशी झालेली नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून धान व भरडधान्य खरेदीसाठी (Paddy Procurement) ऑनलाइन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता २१ ऑक्टोबरअखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या बाबत विभागाचे अवर सचिव संतोष यांनी परिपत्रक काढले आहे.

Paddy Procurement
Paddy Crop Damage : पेणमध्येही भात पिकाला फटका

राज्यांत आतापर्यंत झालेल्या नोंदीमध्ये धान पिकाची सर्वाधिक नोंदणी आहे. त्यांनतर मका, ज्वारी, रागी व बाजरीची नोंदणी आहे. ८ ऑक्टोबरअखेर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाकडे अमरावती जिल्ह्यात अवघ्या मका पिकासाठी एक शेतकऱ्याची नोंदणी झाली आहे.

Paddy Procurement
Paddy Harvesting : परतीच्या पावसामुळे भातकापणी लांबणीवर

धान पिकात चंद्रपूर (९०), गडचिरोली (१,१९३), गोंदिया (२,७८३), नांदेड (४५), ठाणे (५५७) व पालघर(३८१) अशी एकूण ५,०४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मार्केटिंग फेडरेशनकडे बाजरी पिकासाठी नाशिक (८) व धुळे (१) अशी ९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. ज्वारीसाठी जालना (२१), नाशिक (१), यवतमाळ (३९), बुलडाणा (८), धुळे (२७) व जळगाव (४४) अशी एकूण १४० शेतकऱ्यांची नोंदणी आहे. मका पिकात नाशिक (२५६), धुळे (२०) व जळगाव (२) अशी २७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

राज्यातील शेतकरी नोंदणीची स्थिती (ता. ८ ऑक्टोबरअखेर)

संस्था नोंदणी ज्वारी मका धान बाजरी रागी

आदिवासी विकास महामंडळ -- १ ५,०४९ -- --

महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन १४० २७८ ६,९७८ ९ ३४

...असे आहेत हमीदर

खरीप पणन हंगाम २०२१-२२ साठी शासनाने भरडधान्याचे हमीदर हंगामासाठी निश्‍चित केले आहेत. ज्यामध्ये मका १,९६२, ज्वारी मालदांडी २,९३० व ज्वारी हायब्रीड २,९७०, बाजरी २,३५० व रागी ३,५७८ रुपये प्रतिक्विंटल असे जाहीर केले आहेत. शेतकऱ्यांची लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करावी, असे नाशिक जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी कळविले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com