Soybean Market : कापूस, सोयाबीन, हरभऱ्याच्या किमतींत घसरण

जानेवारी महिन्यात कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन यांचीही आवक घसरत होती.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Soybean Cotton Rate जानेवारी महिन्यात कापसाची आवक (Cotton Arrival) वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक (Maize Arrival) मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन यांचीही आवक घसरत होती. तुरीचा हंगाम (Tur Season) सुरू झाला आहे.

तुरीची आवक जानेवारी महिन्यात वाढू लागली आहे. या सप्ताहात सुद्धा ती वाढती आहे. हळद, हरभरा यांची आवक कमी पातळीवर स्थिर होती. कांद्याची व टोमॅटोची आवक या सप्ताहात वाढली आहे.

जानेवारी महिन्यात मूग व टोमॅटो वगळता सर्व शेतीमालाच्या किमती घसरत होत्या. मुगाचा आवक हंगाम संपला आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कापसाच्या व सोयाबीनच्या किमती घसरत आहेत. चांगल्या पिकाच्या अपेक्षेने व बाजारात पुरेसा साठा असल्याने हरभऱ्याची किंमत घसरत आहे. इतर वस्तूंचे भाव या सप्ताहात घसरले.

१ फेब्रुवारीपासून NCDEX मध्ये जून २०२३ डिलिव्हरीसाठी मक्याचे व ऑगस्ट २०२३ डिलिव्हरीसाठी हळदीचे व्यवहार सुरू झाले; तसेच MCX मध्ये फेब्रुवारी २०२४ साठी कपाशीचे व्यवहार सुरू झाले.

Soybean Market
Chana Market : हरभरा दर यंदा तरी वाढतील का?

या सप्ताहातील मुख्य बातमी म्हणजे १३ फेब्रुवारी २०२३ पासून MCX मध्ये पुन्हा कापसाचे फ्यूचर्स व्यवहार सुरू होणार आहेत. ते एप्रिल २०२३, जून २०२३ व ऑगस्ट २०२३ डिलिव्हरीसाठी असतील. किमतीचे परिमाण मात्र यापुढील व्यवहारात बदलेले असेल. किमती कॅन्डी (candy, खंडी) साठी असतील.

(एक कॅन्डी म्हणजे ३५५.५६ किलो). प्रत्येक बोली (टिक-साइझ) २० रुपयांनी कमी-अधिक असेल. डिलिव्हरी युनिट ४८ कॅन्डीचे असेल. (४८ कॅन्डी म्हणजे प्रत्येकी १७९ किलोच्या १०० गाठी.) स्टेपल लांबी २९ मिमी आहे.

मुख्य डिलिव्हरी केंद्र राजकोट असेल; पण अधिकची महाराष्ट्रातील डिलिव्हरी केंद्रे पूर्वीप्रमाणे यवतमाळ व जालना असतील. यांच्या किमती व राजकोट किमती यामध्ये काही फरक नसेल. इतर तपशील MCX च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

कापसाचे फ्यूचर्स व्यवहार व हेजिंग करणाऱ्या शेतकरी व त्यांच्या कंपन्यांसाठी ही आता चांगली सोय झाली आहे. त्यामुळे त्यांना निश्‍चित व अधिक भाव मिळू शकतील.

३ फेब्रुवारी रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) जानेवारी महिन्यात स्थिर होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.३ टक्क्याने घसरून रु. २९,८२० वर आले होते; या सप्ताहात रु. २९,८३० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) १.३ टक्क्याने घसरून रु १,५९१ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

Soybean Market
Cotton Market : कापूस बाजार या आठवड्यात कसा राहिला? 

मका

मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) जानेवरी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,१५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्याने घसरून रु. २,१२६ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (मार्च डिलिव्हरी) किमती रु. २,१४४ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. २,१६८ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती जानेवारी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात त्या रु. ७,२४४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने घसरून रु. ७,२१६ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,३८४ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ७,५०६ वर आल्या आहेत. हळदीत वाढीचा कल आहे.

Soybean Market
Soybean Market : देशातील सोयाबीन दर दबावात का ?

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात १.१ टक्क्याने घसरून रु. ४,८६१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने वाढून रु. ४,८९८ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मूग

मुगाच्या किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ८,००० वर आली होती. या सप्ताहात मात्र ती २.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या किमती जानेवारी महिन्यात कमी होत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) १.३ टक्क्याने घसरून रु. ५,५८३ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा ०.३ टक्क्याने घसरून रु. ५,५६६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.३ टक्क्याने घसरून रु. ६,८६० आली होती. या सप्ताहात ती १.१ टक्क्याने वाढून रु. ६,९३३ वर आली आहे. तुरीची आवक वाढू लागली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२७५ होती; या सप्ताहात ती घसरून रु. १,११० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ८३३ वर आली होती. या सप्ताहात ती घसरून रु. ५०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com