Soybean : हळद, मूग, सोयाबीनमध्ये उतरता कल

देशात १ जून ते १९ ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी अधिक आहे. बिहार, बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश व केरळ येथे पाऊस अजून सरासरीपेक्षा बराच कमी आहे.
Soybean
SoybeanAgrowon

देशात १ जून ते १९ ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी अधिक आहे. बिहार, बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश व केरळ येथे पाऊस अजून सरासरीपेक्षा बराच कमी आहे. मात्र प. राजस्थान, प. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, रायलसीमा, तमिळनाडू व कर्नाटक येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किमती वाढू नयेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पुढील पाच दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश व कोकण या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याचा अंदाज आहे.

आता टोमॅटो वगळता सर्वच पिकांची आवक कमी होऊ लागली आहे. साधारणपणे आवक रोडावल्याने ऑगस्ट महिन्यातील किमती वाढू लागतात. मात्र पुढील खरीप उत्पादन व आवक जर अपेक्षेपेक्षा वाढण्याचा संभव असला, तर किमती उतरू शकतात. गेल्या तीन आठवड्यात कापूस, मका, हरभरा, तूर यांच्या किमती वाढत आहेत. हळद, मूग, सोयाबीन यांच्या किमती मात्र उतरत आहेत. कांद्याच्या किमती उतरत होत्या; मात्र या सप्ताहात त्या परत वाढल्या आहेत. टोमॅटोची आवक अजूनही वाढत असल्याने त्यांच्या किमती रु. १,५०० पेक्षा कमी आहेत. ही आवक आंध्र प्रदेश, तेलंगण व कर्नाटक येथे सर्वाधिक आहे.

Soybean
Soybean : एकूण पेरणीच्या निम्मे क्षेत्र सोयाबीन

या सप्ताहातील किमतीतील चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) जुलै महिन्यात घसरत होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ६.५ टक्क्यांनी वाढून रु. ४७,७४० वर आले आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरी भाव १ टक्क्याने वाढून रु. ४०,२२० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ६ टक्क्यांनी वाढून रु २,३३९ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती ६.४ टक्क्यांनी वाढून रु. २,५०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (सप्टेंबर डिलिव्हरी) किमतीसुद्धा २.७ टक्क्यांनी वाढून रु. २,५६८ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती रु. २,५८१ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने घसरून रु. ७,४६९ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती ०.१ टक्क्याने वाढून रु. ७,३२८ वर आल्या आहेत.

Soybean
Soybean : सोयाबीनवरील खोडमाशीचे नियंत्रण कसे कराल?

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्याने वाढून रु. ४,८०१ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाच्या किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात १.४ टक्क्याने घसरून रु. ६,२६३ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. मुगाची आवक या महिन्यात कमी होऊ लागली आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) जुलै महिन्यात उतरत होती. या सप्ताहात ती ४.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,१६४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० जाहीर झाला आहे. तो गेल्या वर्षापेक्षा ८.९ टक्क्यांनी अधिक आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) जुलै महिन्यात वाढत होती. ती या सप्ताहात ०.५ टक्क्याने वाढून रु. ७,६४० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० जाहीर झाला आहे.

कांदा

कांद्याच्या किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२४५ होती; या सप्ताहात ती २ टक्क्यांनी वाढून रु. १,२७० वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती आतापर्यंत घसरत होत्या. या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून ती रु. १,३५० पर्यंत आली आहे. टोमॅटोची आवक अजूनही वाढती आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com