नाफेडच्या कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार

नाफेडमार्फत कांदा खरेदी केवळ दोन बाजारसमित्यांमध्ये सुरू आहे. या खरेदीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा इतकाही भाव दिला जात नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
Onion Procurement
Onion Procurement Agrowon

नाशिक- मागच्या आठवड्यात नाफेड (NAFED) कांदा खरेदीमध्ये (Onion Procurement) गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाने केला होता. अतिरिक्त उत्पादनामुळे कांद्याच्या बाजारभावावर परिणाम झाल्यामुळे नाफेडने कांदा खरेदी सुरू केली. मात्र नाफेडकडून कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा तक्रार शेतकरी करीत आहेत.

नाफेडमार्फत कांदा खरेदी केवळ दोन बाजारसमित्यांमध्ये सुरू आहे. या खरेदीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा इतकाही भाव दिला जात नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

गुरुवारी लालसगाव मार्केटमध्ये कांद्याचा प्रति क्विंटल दर ५०० ते १३९५ च्या दरम्यान होता. तर ज्या दराने बहुतांश व्यवहार पूर्ण होतात तो दर ९५० प्रति क्विंटलवर स्थिर होता. नाशिकच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सरकार शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्याकडे लक्ष देत असल्याचे सांगितले आहे.

शेतकरी म्हणतात, “सद्या ९ ते ११ रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी केली जात आहे. मात्र कांद्याचा उत्पादन खर्च हा प्रति एकरी खर्च १८ ते २० रुपये एवढा आहे.” नाफेडने खरेदी केल्यानंतर राज्यातील बाजार समित्यांमधील कांद्याच्या दरात वाढ व्हायला हवी होती मात्र राज्यातील दर वाढले नाहीत.

Onion Procurement
कांदा बाजारात अस्थिरता

नाफेडने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ठराविक अशा महासंघांना कांदा खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे नाफेड कांदा खरेदीच्या माध्यमातून या वर्गाचे भले करण्याची योजना राबवत आहे. नाफेडच्या घडामोडीवर आमचे लक्ष असून आम्ही नाफेडचा गैरव्यवहार उघडकीस आणू, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com