Chana sowing: शेतकऱ्यांची हरभऱ्याऐवजी मोहरी, गव्हाला पसंती

केंद्र सरकारने २५ नोव्हेंबर रोजी रब्बी हंगामातील पेरण्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एकूण कडधान्यांचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित घटला आहे, परंतु हरभऱ्याचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

गेल्या काही हंगामांपासून हरभरा हे पीक (Chana Crop) शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे ठरत आहे. सरकारच्या धोरणांमुळे (Agriculture Policy) कडधान्यांना भाव (Pulses Rate) मिळत नाही. हरभऱ्याला सगळ्यात जास्त फटका बसतोय. त्यामुळे देशभरात शेतकरी यंदा हरभऱ्याचा पेरा (Chana Sowing) कमी करताना दिसत आहेत. यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याचे लागवडक्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्हे आहेत.

Chana Rate
Mustard Cultivation : जाणून घ्या मोहरी लागवडीची सुधारित पद्धत

केंद्र सरकारने २५ नोव्हेंबर रोजी रब्बी हंगामातील पेरण्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एकूण कडधान्यांचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित घटला आहे, परंतु हरभऱ्याचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. शेतकऱ्यांनी हरभऱ्याऐवजी गहू आणि तेलबिया पिकांना जास्त पसंती दिली आहे.

देशातील गहू पेरा १०.५ टक्के वाढलाय. देशात यंदा आतापर्यंत १५२ लाख ८८ हजार क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १३८ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पेरा झाला होता. प्रमुख गहू उत्पादक राज्यांपैकी मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक क्षेत्र वाढलं आहे. त्या पाठोपाठ राजस्थानचा क्रमांक लागतो.

Chana Rate
Wheat Cultivation : जाणून घ्या गहू लागवडीचे सुधारित तंत्र

तर तेलबिया पिकांचे लागवडक्षेत्र १३.५ टक्क्यांनी वाढलं आहे. यंदा आतापर्यंत ७५.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबिया पिकांचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तेलबियांचा पेरा ६६.७१ लाख हेक्टर होता. तेलबिया पिकांमध्ये मोहरीने बाजी मारली आहे. गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरपर्यंत सुमारे ६२ लाख हेक्टरवर मोहरीचा पेरा झाला होता.

यंदा याच कालावधीत सुमारे ७१ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. देशातील एकूण मोहरी उत्पादनात एकट्या राजस्थानचा वाटा जवळपास निम्मा आहे. तिथे यंदा मोहरी लागवड ३३.६ लाख हेक्टरवरून ३७.१ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये मोहरी लागवड ९.४४ लाख हेक्टरवरून १२.५३ लाख हेक्टरवर पोहोचली आहे.

Chana Rate
Chana Cultivation : हरभरा लागवड तंत्रज्ञान

मध्य प्रदेशमध्ये गहू आणि मोहरी या दोन्ही पिकांचं क्षेत्र वाढलं आहे. शेतकऱ्यांनी कडधान्यांऐवजी या दोन पिकांना पसंती दिली. त्यामुळे कडधान्यांचा पेरा गेल्या वर्षीच्या २४.७६ लाख हेक्टरवरून २१.४५ लाख हेक्टरवर घसरला आहे. मध्य प्रदेश हे हरभरा आणि मसूर यांच्या उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हरभऱ्याचं क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.५ लाख हेक्टरने घटलं आहे.

मागच्या हंगामात वर्षभर हरभरा हमीभावापेक्षा १० ते २५ टक्क्यापेक्षा कमी दराने विकला गेला. वर्षभर हरभरा प्रति क्विंटल ४२०० ते ४८०० रूपयांच्या कक्षेबाहेर गेला नाही. त्यामुळे यंदा शेतकरी वर्गामध्ये हरभरा पीक घेण्याचा उत्साह दिसक नाही. मोहरीला वर्षभर मिळणारा मजबूत भाव, वाढीव हमीभाव आणि खाद्यतेल किमतीमधील तेजी निदान पुढील सहा महिने तरी टिकण्याचे संकेत यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये हरभऱ्याचे क्षेत्र मोहरीकडे वळते झाले आहे. मागील दोन वर्षांत हरभऱ्याकडे वळलेले गुजरात आता परत मोहरीकडे जात आहे. रब्बीच्या पेरण्या संपताना हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र १० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातही शेतकरी हरभऱ्याऐवजी काही प्रमाणात इतर पिकांना पसंती देत आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांपासून हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक बनलं आहे. पूर्वी रब्बीत हरभऱ्याबरोबर गहू, ज्वारी, मसूर, राजमा, करडई, जवस, मोहरी, सूर्यफूल अशी पिकं घेतली जायची. पण हळूहळू हरभऱ्याचं क्षेत्र वाढत गेलं. रोगराईचा कमी प्रादुर्भाव आणि भावाची खात्री यामुळे हरभरा राज्यात वाढत गेला. इतर पिकांचं क्षेत्र खूपच घटलं. करडईसारखी पिकं तर संपल्यातच जमा आहेत.

पण आता हरभऱ्यावर मर आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. तसेच वर्षानुवर्षे हरभरा हे एकच पीक घेतल्यामुळे जमिनीचा कसही कमी होत आहे. त्यातच गेल्या काही हंगामापासून सरकारच्या धोरणामुळे हरभ्याला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. त्यामुळे शेतकरी रब्बीत हरभऱ्याला पर्यायी पीक शोधत आहेत.

राजमा हे पीक हरभऱ्याच्या तुलनेत कमी कालावधीत हाताशी येते, त्यावर फारसे रोग पडत नाहीत, त्याला पाणीही तुलनेने कमी लागते, भाव चांगला मिळतो. राजमा हे पीक सध्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू येथेच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे या पिकाला फारशी स्पर्धा नाही. म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी राजमा पिकाचा हरभऱ्याला पर्याय म्हणून विचार करावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. राजमा पिकाची नोव्हेंबर अखेरपर्यंत पेरणी करता येऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com