Paddy Cultivation : भात पिकापेक्षा शेतकऱ्यांनी इतर पिकांची लागवड करावी : मनोहर लाल

भातशेतीला मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं, त्याऐवजी शेतकऱ्यांनी मोहरी, मूग, मका यांसारखी पर्यायी पीक घेतली तर ती पीक किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) खरेदी करण्याचं आश्वासन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी दिलंय.
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

भातशेतीला (Paddy Farming) मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं, त्याऐवजी शेतकऱ्यांनी मोहरी, मूग, मका (Maize Crop) यांसारखी पर्यायी पीक (Optional Crop) घेतली तर ती पीक किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) (Minimum Support Price) खरेदी करण्याचं आश्वासन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी दिलंय. आपल्याला पुढील पिढ्यांसाठी पाणी वाचवलं पाहिजे असंही त्यांनी आवाहन केलं. पलवल (हरियाणा) येथील अॅग्रोकेमिकल फर्म धानुका अॅग्रिटेकने, आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र सुरू केलं आहे. या केंद्राच्या उद्घाटनासाठी मनोहर लाल आले होते.

Paddy Cultivation
Paddy Harvesting : भातझोडणीच्या कामांना जिल्ह्यात वेग

यावेळी ते म्हणाले की , पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला पाणी वाचवलं पाहिजे. दरवर्षी 10 फुटांनी भूजल पातळी घटत आहे. 1 किलो तांदळाचं उत्पादन घेण्यासाठी 3000 लिटर पाणी लागतं. हे पाणी वाचवण्यासाठी एका कृषी शास्त्रज्ञाने भात खाणं सोडून दिलं होतं. आपण पाणी वाचवलं नाही आणि पुढच्या पिढीसाठी पाण्याचं दुर्भिक्ष्य ओढवलं तर ते आपल्याला माफ करणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागायती पिकांसह इतर पिकांमध्ये विविधता आणायला हवी.

Paddy Cultivation
Paddy Farming : ड्रम सीडर पेरणीतून पिकवला भात

ड्रॅगन फ्रुटचा प्रचार

ते पुढे म्हणाले की, "आम्ही ड्रॅगन फ्रुटसाठी प्रचारात्मक धोरण सुरू करण्याचा विचार करत आहोत आणि सुरुवातीच्या तीन वर्षांच्या फळधधारणेसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊ." भातासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी इतर विविध पिकं घेण्यासाठी राज्य सरकार प्रति हेक्टर 7,000 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे.

ते म्हणाले की, धानुका अॅग्रीटेक रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (DART) सेंटर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास यातून प्रोत्साहन मिळेल, आणि ही काळाची गरज आहे. ज्या गावात हे सेंटर सुरू झालंय त्या गावाला म्हणजेच सिहोळ गावाला दत्तक घेण्याच्या कंपनीच्या निर्णयाचं त्यांनी कौतुक केलं.

6.24 एकरमध्ये पसरलेल्या या सेंटरमध्ये 10 कोटींची गुंतवणूक करण्यात आलीय. ही सुविधा शेतकरी, संशोधक आणि कृषी क्षेत्रातील इतर भागधारकांसाठी उपलब्ध आहे. DART मध्ये सेंद्रिय संश्लेषण प्रयोगशाळा, विश्लेषणात्मक प्रयोगशाळा, फॉर्म्युलेशन प्रयोगशाळा, माती आणि पाणी विश्लेषण प्रयोगशाळा, कृषी संशोधन प्रयोगशाळा, वनस्पति प्रयोगशाळा, जैव-कीटकनाशक प्रयोगशाळा, बायोसे प्रयोगशाळा, कीटक-संवर्धन प्रयोगशाळा आणि प्रशिक्षण केंद्र आहे.

भविष्यात या सेंटरमध्ये आणखीन सुविधा देऊ असं आश्वासन देताना, धानुका अॅग्रीटेकचे अध्यक्ष आरजी अग्रवाल म्हणाले की, "कृषी क्षेत्रात वैज्ञानिक आणि संशोधनावर आधारित सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन संशोधन केंद्र या दिशेने काम करेल. ही सुविधा शेतकरी आणि संशोधकांसाठी खुली असेल. त्यामुळे या क्षेत्रातील ड्रोन आणि अचूक शेती तंत्र यासारख्या तंत्रज्ञानाच्या वापराला चालना मिळेल."

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com